विरारमध्ये पार्टनरवर काळी जादू करून लाखो रूपयांची फसवणूक करणाऱ्या भामट्याला अटक
विरारमधल्या एका भोंदूबाबाला पोलिसांनी अटक केली आहे. मोहम्मद समीर अब्दुल शकूर उर्फ समीर कादरी असं या भामट्याचं नाव आहे. विरारमध्ये राहणाऱ्या एका माणसाशी त्याने मैत्री वाढवली. त्यानंतर हे दोघे कंस्ट्रक्शन बिझनेसमध्ये एकमेकांचे भागीदारही झाले. दोघांचं एक-दुसऱ्याच्या घरी जाणं येणंही होतं. त्यावेळी समीर कादरीला हे लक्षात आलं की त्याचा पार्टनर धार्मिक आहे आणि तो कोणत्याही धार्मिक […]
ADVERTISEMENT
विरारमधल्या एका भोंदूबाबाला पोलिसांनी अटक केली आहे. मोहम्मद समीर अब्दुल शकूर उर्फ समीर कादरी असं या भामट्याचं नाव आहे. विरारमध्ये राहणाऱ्या एका माणसाशी त्याने मैत्री वाढवली. त्यानंतर हे दोघे कंस्ट्रक्शन बिझनेसमध्ये एकमेकांचे भागीदारही झाले. दोघांचं एक-दुसऱ्याच्या घरी जाणं येणंही होतं. त्यावेळी समीर कादरीला हे लक्षात आलं की त्याचा पार्टनर धार्मिक आहे आणि तो कोणत्याही धार्मिक गोष्टीवर अंधविश्वास ठेवतो.
ADVERTISEMENT
याचाच फायदा घेऊन समीर कादरीने व्यवसायात प्रगती करायची असेल तर घरात पूजा करावी लागेल असं सांगितलं. मी अशा एका बाबांना जाणतो जे हिमालायत राहतात त्यांचं वय 500 वर्षांपेक्षा जास्त असनही ते जिवंत आहेत. हे सगळं सांगून त्याने आपल्या पार्टनरला फसवलं. 14 सप्टेंबर 2021 ला त्याने बंद खोलीत आपल्या पार्टनरला पूजा करायला बसवलं. त्यावेळी बराच धूर त्याच्या नाका-तोंडात गेला. छातीतही गेला. या घटनेत त्याचा मृत्यू झाला.
मात्र या गृहस्थाने जे काही त्याच्या सोबत घडलं होतं ते एका डायरीत लिहून ठेवलं होतं. समीर कादरीने त्याच्या पार्टनरला संमोहित करून आणि धर्माच्या नावाखाली फसवणूक करून त्याच्याकडून 48 लाख रूपये उकळले होते. या बिल्डरची डायरी मिळाल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली ज्यानंतर समीर कादरीला अटक करण्यात आली आहे. 2014 पासून समीर कादरी त्याच्या पार्टनरला फसवत होता ही बाबही उघड झाली आहे.
हे वाचलं का?
या भोंदू बाबा विरोधात विरार पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली त्यानंतर त्याला जादूटोणा विरोधी कायदा 2013 च्या कलम ३, १, आणि भारतीय दंड संहितेच्या 420 आणि 354 च्या अंतर्गत गुन्हाही नोंदवण्यात आला. पोलिसांनी त्याला अटक करून कोर्टात हजर केलं. कोर्टाने त्याला 21 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT