उच्चभ्रू ‘लोढा’ सोसायटीतील घर फोडून चोरट्यांनी तब्बल साडेचार लाखांचे दागिने पळवले!
मिथिलेश गुप्ता, डोंबिवली नवरात्री उत्सवानिमित्त गावी गेलेल्या एका कुटुंबीयांच्या घरात चक्क 4 लाख 50 हजारांच्या मुद्देमालाची चोरी झाली आहे. डोंबिवलीजवळील मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या खोणी गावातील लोढा ऑर्चिड या उच्चभ्रू सोसायटीत हा प्रकार घडला आहे. लोढा ऑर्चिडमधील झा कुटुंबीयांच्या घरी चोरटयांनी अत्यंत धाडसी असा दरोडा टाकला. चक्क प्रसाधनगृहाला असलेल्या खिडकीचे गज तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला […]
ADVERTISEMENT

मिथिलेश गुप्ता, डोंबिवली
नवरात्री उत्सवानिमित्त गावी गेलेल्या एका कुटुंबीयांच्या घरात चक्क 4 लाख 50 हजारांच्या मुद्देमालाची चोरी झाली आहे. डोंबिवलीजवळील मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या खोणी गावातील लोढा ऑर्चिड या उच्चभ्रू सोसायटीत हा प्रकार घडला आहे.
लोढा ऑर्चिडमधील झा कुटुंबीयांच्या घरी चोरटयांनी अत्यंत धाडसी असा दरोडा टाकला. चक्क प्रसाधनगृहाला असलेल्या खिडकीचे गज तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला आणि सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारला. यावेळी तब्बल साडेचार लाखांचा मुद्देमाल चोरी करण्यात आला आहे. तर काही रोख रक्कमही चोरी केल्याची माहिती अंकित झा यांचे मित्र महेश ठोंबरे यांनी दिली.
या घरफोडीबाबत मानपाडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात असून पोलिसांनी आता तपास चालू केला आहे.