उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज ठाकरेंच्या भेटीला, मनसेच्या आमदाराला मंत्रिपदाची लॉटरी?

ऋत्विक भालेकर

महाराष्ट्राचे उपमुख्यंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवतीर्थ या राज ठाकरेंच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रात घडलेल्या सत्तानाट्यानंतर पहिल्यांदाच राज ठाकरे यांच्या भेटीला गेले होते. राज्यात ३० जूनला सत्तांतर झालं. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतली तर देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री झाले. या राजकीय घडामोडींनंतर राज ठाकरे यांनी पत्र लिहून एकनाथ […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

महाराष्ट्राचे उपमुख्यंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवतीर्थ या राज ठाकरेंच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रात घडलेल्या सत्तानाट्यानंतर पहिल्यांदाच राज ठाकरे यांच्या भेटीला गेले होते. राज्यात ३० जूनला सत्तांतर झालं. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतली तर देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री झाले. या राजकीय घडामोडींनंतर राज ठाकरे यांनी पत्र लिहून एकनाथ शिंदे यांचं अभिनंदन केलं होतं. तसंच देवेंद्र फडणवीस यांचीही पत्र लिहून स्तुती केली होती.

“धनुष्यातून ध्येयाचा वेध घ्यायचा तर दोरी मागे ओढावी लागते” राज ठाकरेंचं देवेंद्र फडणवीसांना पत्र

राजू पाटील (Raju Patil) यांना मंत्रिमंडळात स्थान मिळणार?

या राजकीय घडामोडी घडल्यानंतर विधानसभेत जेव्हा विशेष अधिवेशन बोलवण्यात आलं तेव्हा राज ठाकरे यांचे आभार देवेंद्र फडणवीस यांनी मानले. तसंच लवकरच आपण त्यांची भेट घेणार आहोत असंही देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं. त्यानुसार हे दोन नेते आज भेटले आहेत. या दोघांच्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांना मंत्रिमंडळात स्थान मिळणार की ही चर्चा जोरात सुरू आहे.

मनसेने राज्यसभेच्या निवडणुकीत तसंच विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपला पाठिंबा दिला होता. तसंच आता होणाऱ्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीतही एनडीएच्या उमेदवाराला म्हणजेच द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा दिला आहे. आता या सगळ्याच्या बदल्यात मंत्रिमंडळ विस्तारात मनसेला मंत्रिपद अपेक्षित आहे. मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांना मंत्रिमंडळात स्थान मिळू शकतं. त्याबाबत या दोन नेत्यांची चर्चा झाली असावी अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp