आमदार नितेश राणे सिंधुदुर्ग जिल्हा कोर्टात शरण, जामीन अर्जावर सोमवारी होणार फैसला
सुप्रीम कोर्टाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर भाजप आमदार नितेश राणे हे सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयात हजर झाले. सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचे प्रचारप्रमुख संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्लाप्रकरणी नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज सुप्रीम कोर्टाने गुरुवारी फेटाळला. यावेळी सुप्रीम कोर्टाने नितेश राणे यांना जिल्हा न्यायालयात शरण जाण्यास तसंच नियमित जामिनासाठी अर्ज करावा असे […]
ADVERTISEMENT
सुप्रीम कोर्टाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर भाजप आमदार नितेश राणे हे सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयात हजर झाले. सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचे प्रचारप्रमुख संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्लाप्रकरणी नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज सुप्रीम कोर्टाने गुरुवारी फेटाळला. यावेळी सुप्रीम कोर्टाने नितेश राणे यांना जिल्हा न्यायालयात शरण जाण्यास तसंच नियमित जामिनासाठी अर्ज करावा असे निर्देश दिले होते. यासाठी कोर्टाने नितेश राणे यांना दहा दिवसांची मुदत दिली होती. तसंच तोपर्यंत त्यांना अटक करु नये असे निर्देश देत अंशतः दिलासा दिला होता.
सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्देशानुसार आज नितेश राणे सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयात हजर झाले. यावेळी त्यांचे बंधू माजी खासदार निलेश राणेही सोबत होते. तसंच त्यांचे वकील सतीश मानशिंदेही उपस्थित होते. मात्र सरकारी वकील प्रदीप घरत हे अनुपस्थित राहिल्याने पुढील सुनावणी 31 जानेवारीला होणार आहे.
सुप्रीम कोर्टात काय घडलं?
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
नितेश राणे यांच्या याचिकेवर सरन्यायाधीश रमण्णा, न्या. हिमा कोहली आणि न्या. ए. एस. बोपण्णा यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. त्यावेळी नितेश राणेंची बाजू अॅड. मुकुल रोहतोगी यांनी मांडली. नितेश राणे यांच्याविरोधात झालेली कारवाई चुकीची आहे. नितेश राणेंविरोधातली कारवाई ही चुकीच्या राजकीय हेतून प्रेरित आहे असाही दावा यावेळी रोहतोगी यांनी केला. तर महाराष्ट्र सरकारच्या वतीने अॅड. अभिषेक मनू सिंघवी यांनी बाजू मांडली. नितेश राणे यांच्या विरोधातले गुन्हे हे राजकीय नाहीत तर इतर आहेत हे त्यांनी कोर्टासमोर सांगितलं. सध्या सुरू असलेल्या तपासात पैशांची देवाणघेवाण झाली का? कट आखला गेला का? या सगळ्याचा तपास होणं आवश्यक आहे हे त्यांनी न्यायालयाला सांगितलं आणि त्याचसोबत अटकपूर्व जामीन फेटाळण्यात यावा अशीही मागणी केली.
काय आहे प्रकरण?
ADVERTISEMENT
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणूक रणधुमाळीत शिवसेना कार्यकर्ते संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ल्या प्रकरणी भाजप आमदार नितेश राणे वादाच्या भावर्यात आडकले आहेत. 18 डिसेंबर 2021 रोजी संतोष परब यांच्यावर कणकवलीत हल्ला झाला होता. परब हे जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचे निकटवर्तीय असून करंजे गावचे माजी सरपंच आहेत. त्यांच्यावर इनोव्हा कारमधून आलेल्या दोघांनी धारदार चाकूने वार केले होते. या हल्ल्यात परब जखमी झाले होते. या प्रकरणाला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकिय शत्रुत्वाची पार्श्वभूमी असल्याच्या संशयावरून पोलिसांनी भाजपच्या गोटात चौकशीची सूत्रे हलवली आहेत. मुख्य संशयित आरोपी सचिन सातपुतेला सिंधुदुर्ग ग्रामीण पोलिसांनी दिल्लीतून अटक करण्यात यश मिळवले आहे. सातपुते हा भाजप आमदार नितेश राणे यांच्या स्वाभिमानी संघटनेचा कार्यकर्ता आहे. त्यामुळे या प्रकरणात नितेश राणेंची चौकशी सुरू करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT