माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना अटकेपासून संरक्षण

विद्या

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना २० मे पर्यंत अटकेपासून संरक्षण मिळालं आहे. परमबीर सिंग यांच्याविरोधात भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयात सुरु असलेल्या सुनावणीदरम्यान जस्टीस पी.बी.वराले आणि एन.आर.बोरकर यांच्या खंडपीठाने हे आदेश दिले आहेत. परमबीर सिंग यांच्याबाजूने प्रसिद्ध वकील महेश जेठमलानी यांनी कोर्टात बाजू मांडली. परमबीर सिंग यांच्याविरोधात […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना २० मे पर्यंत अटकेपासून संरक्षण मिळालं आहे. परमबीर सिंग यांच्याविरोधात भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयात सुरु असलेल्या सुनावणीदरम्यान जस्टीस पी.बी.वराले आणि एन.आर.बोरकर यांच्या खंडपीठाने हे आदेश दिले आहेत.

परमबीर सिंग यांच्याबाजूने प्रसिद्ध वकील महेश जेठमलानी यांनी कोर्टात बाजू मांडली. परमबीर सिंग यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात कोणतही तथ्य नसल्याचा युक्तीवाद जेठमलानी यांनी केला. यावर महाराष्ट्र सरकारची बाजू मांडणारे वकील खंबाटा यांनी उत्तर देण्यासाठी वेळ हवा असल्याचं सांगितलं, ज्यावर जेठमलानी यांनी तोपर्यंत परमबीर यांच्याविरोधात कोणतीही कारवाई होऊ नये अशी मागणी केली.

परमबीर यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याचा तपास कुठपर्यंत सुरु आहे असं विचारलं असता खंबाटा यांनी तपास सुरु असल्याचं सांगितलं. अकोला पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस निरीक्षक भीमराव घाडगे यांनी परमबीर यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती, जी तक्रार नंतर ठाणे पोलिसांकडे तपासासाठी वर्ग करण्यात आली. आपल्या तक्रारीत घाडगे यांनी सिंग यांच्याविरोधात भ्रष्टाचाराचे अनेक आरोप केले आहेत.

२०१५ ते २०१८ या काळात भीमराव घाडगे ठाणे पोलीसांच्या सेवेत होते. परमबीर सिंग यांनी आपल्याला एका प्रकरणात काही लोकांची नावं FIR मधून काढून टाकण्यासाठी दबाव आणला. ज्यावेळी मी असं करण्यास नकार दिला त्यावेळी आपल्याविरोधात खोटा गुन्हा दाखल करण्यात आल्याचं घाडगे यांनी तक्रारीत म्हटलं आहे. आपल्याविरोधात दाखल करण्यात आलेला गुन्हा रद्द करावा यासाठी परमबीर यांनी कोर्टात धाव घेतली होती.

हे वाचलं का?

    follow whatsapp