Omicron Variant : RT-PCR टेस्टमध्ये कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटचं निदान होणार की नाही? समजून घ्या
ओमिक्रॉन वेरिएंट आल्यानंतर एक ना अनेक प्रश्न पडलेत, त्यात या ही चर्चा होत होत्या की RT-PCR चाचणीमध्ये हा व्हायरसच डिटेक्टच होणार नाही. मग अशात मला कोरोना झालाय, हे कळणार कसं? ओमिक्रॉन कोरोना वेरिएंटमुळे आता नवीन चाचणी करावी लागेल का? या प्रश्नांची उत्तरं समजून घेऊयात. असं म्हणतायत की ओमिक्रॉन व्हायरस याचा संसर्ग होण्याचा वेग हा प्रचंड […]
ADVERTISEMENT
ओमिक्रॉन वेरिएंट आल्यानंतर एक ना अनेक प्रश्न पडलेत, त्यात या ही चर्चा होत होत्या की RT-PCR चाचणीमध्ये हा व्हायरसच डिटेक्टच होणार नाही. मग अशात मला कोरोना झालाय, हे कळणार कसं? ओमिक्रॉन कोरोना वेरिएंटमुळे आता नवीन चाचणी करावी लागेल का? या प्रश्नांची उत्तरं समजून घेऊयात.
ADVERTISEMENT
असं म्हणतायत की ओमिक्रॉन व्हायरस याचा संसर्ग होण्याचा वेग हा प्रचंड आहे. दक्षिण आफ्रीकेच्या ज्या प्रांतातून ओमिक्रॉन सापडला, तिथे हॉस्पिटलमध्ये रुग्णांची संख्या ही 8 टक्क्यांनी वाढली आहे. युके, दक्षिण आफ्रीका, ब्राझील, बांगलादेश, बोत्सवाना, चीन, मॉरिशिअस, न्यूझीलंड, जिम्बाब्वे, हाँगकाँग, सिंगापूर, इस्राईल हे देश हाय रिस्क कॅटेगरीत आहेत.
जागतिक आरोग्य संघटनेनंही सांगितलंय की ओमिक्रॉन वेरिएंटने जगाला धोका आहे, कारण तो लवकर पसरतोय.
हे वाचलं का?
त्यामुळेच अमेरिका, जपान, ब्रिटन, इस्राईल, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड अशा 19 देशांनी आपल्या देशात येणाऱ्या लोकांसाठी निर्बंध घालायला पुन्हा सुरूवात केली आहे. भारतानेही आंतरराष्ट्रीय विमानप्रवास करून येणाऱ्या नागरिकांना RT-PCR टेस्ट करण्याची सक्ती केली आहे.
Omicron: डेल्टापेक्षा अधिक शक्तिशाली मानल्या जाणाऱ्या Omicron व्हेरिएंटपासून कसा कराल बचाव?
ADVERTISEMENT
पण हा विषाणू आपलं रूप बदलतोय, या विषाणूबाबत जी प्राथमिक माहिती समोर आली आहे त्यानुसार ज्यांनी लस घेतली आहे, ज्यांना कोरोना होऊन गेलाय, रोगप्रतिकारशक्ती ज्यांच्यात तयार झाली आहे अशालाही चकवा देत हा व्हायरस आपल्या शरीरात पसरू शकतो. अशात RT-PCR चाचणीत तो दिसूनच आला नाही तर काय?
ADVERTISEMENT
WHO चं म्हणणं आहे की जगभरात वापरल्या जाणाऱ्या बहुतांश RT-PCR टेस्टमध्ये हा वेरिएंट डिटेक्ट होईल. ICMRचे महासंचालक बलराम भार्गव यांनीही सांगितलं की, ओमिक्रॉन वेरिएंट हा फक्त RT-PCR चं नाही तर रॅपिड अँटिजन टेस्टलाही चकवा देणार नाही, भारतात होणाऱ्या या दोन्ही प्रकारच्या टेस्टमधून तो कळेल.त्यामुळे राज्य सरकारांनी टेस्टिंगचं प्रमाण वाढवावं जेणेकरून त्याचा प्रसार थांबवू शकू.
Omicron Variant कोणाला आहे धोकादायक आणि भारतीय लसी किती प्रभावी ठरणार?
या सगळ्या शंकांमध्ये आणखी एक गोष्ट समजून घेतली पाहिजे, ती म्हणजे की RT-PCR टेस्ट ही फक्त आपल्या शरीरात तो व्हायरस आहे की नाही हे कळण्यासाठी केली जाते. आपल्या शरीरात असणारा तो व्हायरस कोणत्या प्रकारचा आहे, म्हणजेच त्याचा वेरिएंट कोणता आहे जिनोम सिक्वेन्सिंगने कळतं. आतासुद्धा तुमच्या कानावर बऱ्याचदा हे आलं असेल की ओमिक्रॉन वेरिएंट आहे की नाही हे समजण्यासाठी सँम्पल्सहे जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवले आहेत. याचाच अर्थ हा की वेरिएंट कोणता हे जिनोम सिक्वेन्सिंगमध्ये कळतं, RT-PCR टेस्टमध्ये नाही.
स्पाईक प्रोटीन ते असतात ज्याच्यामुळे व्हायरस आपल्या शरीरात शिरतो. कोरोना व्हायरसचे फोटो तुम्ही पाहिले असतीलच, त्यातून असे स्पाईक निघालेले तुम्हाला दिसत असतील, तेच स्पाईक प्रोटीन असतात, ज्याच्यात बदलही होत असतात, त्यालाच आपण म्युटेशन म्हणतो.
Omicron Variant : कोरोनाचं नवं रूप ओमिक्रॉनची लक्षणं कोणती?
अशाच प्रकारचे बदल-म्युटेशन या व्हायरसमध्ये 30 वेळा होतायत, असंही प्राथमिक माहितीतून समोर आलंय. त्यामुळेच RT-PCR टेस्टमध्ये तो कळून येणार नाही, असं काही जणांना वाटतंय. पण स्पाईक प्रोटीनमध्ये होणारं हे म्युटेशन काही पहिल्यांदाच नाहीये, याआधी आलेल्या अल्फा वेरिएंटमध्येही अशाप्रकारे म्युटेशन होत होते. पण त्याने RT-PCR टेस्टवर काही फरक पडला नाही.
WHO ने दिलेल्या माहितीनुसार, थरमो फिशरची जी RT-PCR टेस्टिंग कीट आहे, जी जगभरात मोठ्या प्रमाणावर वापरली जाते, त्यात ओमिक्रॉन वेरिएंटचं अस्तित्व हे कळू शकतंय. जिनोम सिक्वेन्सिंगमध्ये हे ठळकपणे समजतं, फक्त त्याचे निदान व्हायला साधारण 24 ते 96 तास लागतात, त्यामुळे रिझल्ट्स येईपर्यंत क्वॉरंटाईन होणं, आयसोलेट राहणं हेच योग्य ठरेल.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT