कोरोना पुन्हा पाय पसरतोय, आज मुख्यमंत्र्यांनी बोलावली तातडीची बैठक

मुंबई तक

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
social share
google news

गेल्या काही दिवसांपासून राज्यात अचानक कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होतेय. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज वर्षा निवासस्थानी तातडीची बैठक बोलावलीय. या बैठकीत मुख्यमंत्री सर्व जिल्ह्यांतल्या स्थितीचा आढावा घेणार आहेत.

ADVERTISEMENT

व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणाऱ्या या बैठकीत सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी सहभागी होणार आहेत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, सोमवारी औरंगाबादेत पत्रकारांशी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातल्या कोरोना स्थितीबाबत चिंता व्यक्त केली.

ते म्हणाले, ‘सध्या अनेकजण मास्क घालत नसल्याचं दिसून येतंय. कोरोनाबाबत आवश्यक ती खबरदारी अजूनही नीट घेतली जात नाही. त्यामुळे याची जबरदस्त किंमत मोजावी लागेल.’

हे वाचलं का?

‘गेल्या काही दिवसात राज्यात कोरोना रुग्ण मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याचं दिसून येतंय. सध्या लोकांचा जीव वाचवणं हेच आमच्यासाठी महत्त्वाचं आहे,’ असं म्हणत अजित पवारांनी कोरोनासंबंधी कठोर निर्णय घेणार असल्याचे संकेत दिले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यंत्री अजित पवार यांची कोरोना स्थितीबद्दल आज बैठकही होणार आहे. या बैठकीच काही महत्त्वाचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT