Crime : सकाळी प्रेयसीची हत्या, मृतदेह फ्रीजमध्ये ठेवून दुसरीशी केलं लग्न

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Delhi Crime news। Nikki Yadav murder case

दिल्ली : संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणासारखी आणखी एक घटना दिल्लीतून (Delhi) समोर आली आहे. दिल्ली पोलिसांना निक्की यादव (Nikki Yadav) नावाच्या एका मुलीचा मृतदेह एका ढाब्याच्या फ्रीजमध्ये सापडला आहे, यामुळे खळबळ उडाली आहे. पोलिसांनी याप्रकरणात साहिल गेहलोत नावाच्या संशयित आरोपीला अटक केली आहे. (Nikki Yadav murder case in new delhi)

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, निक्की आणि साहिल २०१८ पासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. मात्र आता साहिल दुसऱ्या मुलीशी लग्न करण्याच्या तयारीत होता. यावरून दोघांमध्ये यापूर्वी वादही झाला होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, “दुसऱ्या मुलीशी लग्न केलं तर तुला अडकवेन, अशी धमकी निक्कीने साहिलला दिली होती. यानंतरच त्याने निक्कीच्या हत्येचा कट रचला आणि हा गुन्हा केला. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

ADVERTISEMENT

Crime: आईसोबत अनैतिक संबंधांचा संशय, तरुणांच्या कृत्यानं हादरलं नांदेड

कसा केला खून?

चौकशीदरम्यान, आरोपी साहिलने कबूल केलं की त्याने १० फेब्रुवारी रोजी दिल्लीच्या ISBT जवळ एका कारमध्ये निकीचा गळा दाबून खून केला होता, तिची हत्या केल्यानंतर मृतदेहासोबत बराच वेळ कारमध्ये फिरत राहिला. त्यानंतर त्याने मृतदेह ढाब्याच्या रेफ्रिजरेटरमध्ये ठेवला. या प्रकरणातील सर्वात मोठी गोष्ट म्हणजे साहिलने सकाळी निक्कीची हत्या केली आणि त्याच संध्याकाळी घरच्यांच्या सांगण्यावरून दुसऱ्या मुलीशी लग्नही केलं.

हे वाचलं का?

या संपूर्ण प्रकरणावर अतिरिक्त उपायुक्त विक्रम सिंह यांनी सांगितले की, एका मुलीची हत्या करुन तिचा मृतदेह एका ढाब्यात लपवून ठेवल्याची माहिती त्यांना मंगळवारी सकाळी मिळाली होती. पोलिसांनी घटनास्थळी जावून मृतदेह ताब्यात घेतला. तपासानंतर आरोपी साहिल गेहलोत याला अटक करण्यात आली. आता पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे. आरोपीने मोबाईल केबलच्या सहाय्याने निक्कीचा गळा आवळून खून केल्याचंही पोलिसांनी सांगितलं. ज्या ढाब्यावर मृतदेह ठेवण्यात आला होता तो ढाबाही साहिल गेहलोतच्या मालकीचा असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.

Crime : सकाळी बातमी आली, दुपारी गाडीने उडवलं; हा पत्रकाराचा खूनच! कोणी केला आरोप?

ADVERTISEMENT

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निक्की आणि साहिल दोघेही एकमेकांना अनेक वर्षांपासून ओळखत होते. एसएससी परीक्षेसाठी उत्तम नगरमधील एका कोचिंग सेंटरमध्ये जात असतानाच निक्कीही एका इन्स्टिट्यूटमध्ये शिकत होती. यादरम्यान दोघे एका बसने प्रवास करायचे. यावेळी आधी त्यांची मैत्री झाली आणि नंतर प्रेम झाले. २०१८ मध्ये पुन्हा दोघे लिव्ह-इनमध्ये राहू लागले, आरोपीने याबाबत घरच्यांना काहीही सांगितलं नव्हतं. दोघेही एकत्र अनेक ठिकाणी फिरायला जायचे, सर्व काही ठीक चालले होते.

ADVERTISEMENT

मात्र साहिल दुसऱ्या मुलीशी लग्न करणार असल्याचं निक्कीला कळताच त्यांचं जोरदार भांडण झालं आणि त्यानंतरच साहिलनं तिची हत्या केली. तपासासाठी पोलिसांनी स्वतंत्र टीम तयार केली होती. साहिलने त्याचा फोन बंद केला होता. मात्र गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी दिल्लीतील कैर गावातून अटक त्याला केली आहे. पुढील तपास सुरु आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT