Fadnavis: कर्नाटक सरकार स्वतः महाराष्ट्रातील मंत्र्यांना पाठवणार निमंत्रण
दिल्ली : महाराष्ट्रातील दोन मंत्री कर्नाटकला जाणार होते, त्यावेळी कर्नाटकने मनाई केली होती. हा मुद्दा आम्ही मांडला. त्यावर त्यांनी सांगितले की, या स्थितीचा फायदा घेऊन गोंधळ होण्याची शक्यता असल्याचे इनपूट त्या सरकारकडे होते आणि त्यामुळे त्यांनी तसे पत्र पाठविले. मात्र कर्नाटक सरकार आता स्वत: महाराष्ट्रातील मंत्र्यांना निमंत्रित करणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी […]
ADVERTISEMENT

दिल्ली : महाराष्ट्रातील दोन मंत्री कर्नाटकला जाणार होते, त्यावेळी कर्नाटकने मनाई केली होती. हा मुद्दा आम्ही मांडला. त्यावर त्यांनी सांगितले की, या स्थितीचा फायदा घेऊन गोंधळ होण्याची शक्यता असल्याचे इनपूट त्या सरकारकडे होते आणि त्यामुळे त्यांनी तसे पत्र पाठविले. मात्र कर्नाटक सरकार आता स्वत: महाराष्ट्रातील मंत्र्यांना निमंत्रित करणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वात बुधवारी सीमावादवर पार पडलेल्या एका बैठकीनंतर बोलत होते.
अमित शाह यांच्या कालच्या बैठकीला फडणवीस यांच्यासह महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आणि कर्नाटकचे गृहमंत्री आरागा ज्ञानेंद्रा उपस्थित होते. या सर्वांमध्ये अमित शाह यांच्या संसदेतील कार्यालयात २५ मिनिटे चर्चा झाली. त्यानंतर या बैठकीत काय निर्णय घेण्यात आले याची माहिती अमित शाह यांनी माध्यमांना दिली.
बैठकीत काय निर्णय घेण्यात आले?
-
महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्ही राज्यांतील सीमावाद रस्त्यावर मिटू शकत नाही, त्यासाठी संविधानाच्या माध्यमातून प्रयत्न केला जाईल.
सीमावाद सध्या सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. जोपर्यंत सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय येत नाही तोपर्यंत दोन्ही राज्य एकमेकांच्या भूभागावर दावा सांगणार नाहीत. कोणताही वाद घालणार नाहीत.