Kapil Sharma: शाहरूख खान कपिलला म्हणाला,”तू ड्रग्ज घेतोस का?”, नेमकं काय घडलं होतं?
kapil sharma Interview : कॉमेडी किंग kapil sharmaचं आज मनोरंजन विश्वात एक मोठं नाव आहे. कपिल शर्मा घराघरांत पोहोचला आहे. एकेकाळी सामान्य जीवन जगणाऱ्या कपिल शर्माने मेहनतीच्या बळावर आज यश मिळवलं आहे. कपिल हा नेहमीच वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत असतो. त्याचा लाइव्ह शो पाहण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात. पण, एक काळ असा होता जेव्हा त्याला भेटण्याची […]
ADVERTISEMENT
kapil sharma Interview : कॉमेडी किंग kapil sharmaचं आज मनोरंजन विश्वात एक मोठं नाव आहे. कपिल शर्मा घराघरांत पोहोचला आहे. एकेकाळी सामान्य जीवन जगणाऱ्या कपिल शर्माने मेहनतीच्या बळावर आज यश मिळवलं आहे. कपिल हा नेहमीच वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत असतो. त्याचा लाइव्ह शो पाहण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात. पण, एक काळ असा होता जेव्हा त्याला भेटण्याची कोणालाही इच्छा नव्हती. नुकत्याच झालेल्या एका शोच्या मुलाखतीत कपिलने त्याच्या आयुष्यातील अनेक पदर उलगडून सांगितले आहेत. (why Shah Rukh Khan asked Kapil Sharma that Do you take drugs)
ADVERTISEMENT
भाजप-राष्ट्रवादी एकत्र : सुषमा अंधारेंचं एकनाथ शिंदेंसह 40 आमदारांना चॅलेंज
शोमध्ये कपिल शर्माला अनेक प्रश्न विचारण्यात आले. त्यावर त्याने मनमोकळेपणाने उत्तरं दिली. जेव्हा कपिलला विचारण्यात आलं की, ‘अनेक वेळा अशा बातम्या येतात की, तुमच्या शोमध्ये सेलिब्रिटींना बोलवल्यानंतर तुम्ही स्वतःच शूट कॅन्सल करता, त्यामुळे सेलेब्स तुमच्यावर नाराज होतात?’
हे वाचलं का?
यावर कपिल म्हणाला, “मी कधीही सेलिब्रिटींना थांबायला लावलं नाही. लोक काहीही म्हणतात. मला हवं असलं तरी मी सेटवर उशीर करू शकत नाही कारण माझं कामचं तसं आहे. जर मला 2 वाजता रोल करायचा असेल, तर मला 4 तास आधी स्टँडअप किंवा रिहर्सल करावी लागते. ज्यावेळी शाहरुख खान 1 वाजता येणार हे कळायचे तेव्हा माझी चिंता वाढायची. मी पावणे एक वाजताच पोहोचायचो. मला जमणार नाही असं वाटायचं.”
‘बाकीचे 34 लोक कुठेय?’, सुषमा अंधारेंनी सोमय्यांनी गाठलं खिंडीत, इतिहासच काढला
ADVERTISEMENT
“ड्रग्ज घेतोस का?”, शाहरूखने कपिलला असं का विचारलं होतं?
ADVERTISEMENT
कपिल पुढे म्हणाला की, “एकदा शाहरूख भाईसोबत माझं शूट कॅन्सल झालं होतं, तेव्हा मला वाईट वाटलं. त्यानंतर 3-4 दिवसांनी माझी शाहरूखशी भेट झाली. त्यावेळी ते फिल्म सिटीमध्ये एका शूटसाठी आले होते. जवळजवळ एक तास आम्ही गाडीत बसून गप्पा मारल्या. त्यांनी मला समजून घेतलं असावं. शाहरुख भाईने मला विचारलं की, ‘तू ड्रग्ज घेतोस का?’ मी म्हणालो, नाही भाई. मी कधी ड्रग्ज घेतले नाहीत. मी सांगितलं की मला काम करावसं वाटत नाही. तेव्हा त्यांनी चांगल्या गोष्टी समजावून सांगितल्या. मी स्वतःमध्ये खूप हरवलो होतो. आजही तो काळ आठवला की वाटतं, तो काळ वाईट होता.”
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT