पुणे : आग विझवून घरी परतणाऱ्या अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्याचा अपघाती मृत्यू

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

शुक्रवारी मध्यरात्री पुण्याच्या कॅम्प परिसरातील फॅशन स्ट्रिट भागात मोठी आग लागली. या आगीमध्ये परिसरातली अनेक छोटी कपड्याची दुकानं जळून खाक झाली आहेत. पुणे अग्निशमन दलाच्या १६ गाड्या आणि ५० जवानांसह १० अधिकाऱ्यांनी घटनास्थळी अथक मेहनत घेऊन पहाटे या आगीवर नियंत्रण मिळवलं. परंतू यानंतर घरी परतत असताना अग्निशमन दलाच्या एका अधिकाऱ्याला अपघातात आपले प्राण गमवावे लागले आहेत. पुणे कॅन्टोन्मेंट अग्निशमन दलाचे अधिकारी प्रकाश हसबे यांच्या दुचाकीवरुन घरी परतत असताना अपघाती मृत्यू झाल्यामुळे एकच हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

ADVERTISEMENT

पुण्यातील फॅशन स्ट्रीट भागात भीषण आग, आगीत शेकडो दुकानं जळून खाक

हसबे यांच्यासोबत काम करणाऱ्या अधिकाऱ्यांनी या घटनेविषयी ‘मुंबई तक’ ला माहिती दिली. “रात्री साडे दहा वाजल्याच्या सुमारास हसबेंना फॅशन स्ट्रिट भागात लागलेल्या आगीविषयी माहिती कळली. यानंतर ते आग विझवण्याच्या कामात पहाटेपर्यंत आमच्यासोबत होते. आग विझवल्यानंतर हसबे यांनी थोडा वेळ आमच्याशी गप्पा मारल्या. यानंतर घरी जाऊन फ्रेश होऊन येतो आणि मग सकाळी भेटू असं म्हणून हसबे घरी जायला निघाले. मात्र घरी जात असताना येरवडा भागात त्यांच्या दुचाकीला मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली, ज्यात त्यांचा जागीच मृत्यू झाल्याचं आम्हाला कळलं.” हसबे यांच्यासारख्या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याचा अशा पद्धतीने मृत्यू झाल्यामुळे सर्व स्तरातून शोक व्यक्त करण्यात येत आहे.

हे वाचलं का?

फॅशन स्ट्रीटवरील एका दुकानदाराने ‘मुंबई तक’शी बोलताना सांगितले की, ‘वीकेंडसाठी शुक्रवारीच बरेच दुकानदार हे आपल्या दुकानात सामान ठेवतात. आठवड्याच्या शेवटी प्रत्येक दुकानदाराकडे साधारण तीन लाखांपर्यंत माल असतो. त्यामुळे तुम्ही अंदाज लावा की किती नुकसान झालं असेल.’

पुण्यातील या फॅशन स्ट्रीटवरील दुकानांमध्ये कपड्यांपासून ते इलेक्ट्रॉनिक्स पर्यंतच्या अनेक वस्तू स्वस्त दरात उपलब्ध होत असल्याने पुणेकरांची नेहमीच इथे गर्दी पाहायला मिळायची.

ADVERTISEMENT

या भीषण आगीच्या घटनेनंतर आता दुकानदारांना राज्य सरकारकडून मदतीची अपेक्षा आहे. जेणेकरुन दुकानदार, कामगार आणि येथे काम करणारी लोकं हे पुन्हा नव्याने आपला व्यवसाय सुरू करू शकतील. गेल्या 15 दिवसांत कॅम्प परिसरात आग लागण्याची ही दुसरी घटना आहे. याआधी शिवाजी मार्केटमध्ये भीषण आग लागल्याची घटना समोर आली होती. ज्यामध्ये 25 दुकाने भस्मसात झालेली.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT