Income Tax Raid : 58 कोटी रोख, 32 किलो सोनं; जालन्यातील उद्योजकाकडे सापडलं 390 कोटींचं घबाड
ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयाच्यानंतर आयकर विभागाच्या एका मोठ्या कारवाईबद्दल माहिती समोर आलीये. आयकर विभागाने जालन्यातील एका उद्योजकांच्या विविध मालमत्तांवर धाडी टाकल्या. १ ऑगस्ट ते ८ ऑगस्ट दरम्यान आयकर विभागाच्या पथकांनी छापेमारी केली. यात तब्बल 58 कोटी रुपये रोख रक्कम. ३२ किलो सोनं, हिरे-मोती आणि इतर संपत्तीची कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. पश्चिम बंगालमधील एसएससी घोटाळ्यात […]
ADVERTISEMENT

ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयाच्यानंतर आयकर विभागाच्या एका मोठ्या कारवाईबद्दल माहिती समोर आलीये. आयकर विभागाने जालन्यातील एका उद्योजकांच्या विविध मालमत्तांवर धाडी टाकल्या. १ ऑगस्ट ते ८ ऑगस्ट दरम्यान आयकर विभागाच्या पथकांनी छापेमारी केली. यात तब्बल 58 कोटी रुपये रोख रक्कम. ३२ किलो सोनं, हिरे-मोती आणि इतर संपत्तीची कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत.
पश्चिम बंगालमधील एसएससी घोटाळ्यात प्रचंड मोठं घबाड समोर आल्यानंतर आता महाराष्ट्रातही अशीच कारवाई समोर आलीये. जालन्यातल्या एका स्टील, कपडे आणि बांधकाम व्यावसायिक असलेल्या उद्योजकाच्या विविध मालमत्तांवर आयकर विभागाने धाडी टाकल्या. यात मोठ्या प्रमाणात संपत्ती आढळून आली आहे.
Income Tax Raid in Jalna : पैसे मोजण्यासाठी लागले १३ तास
आयकर विभागाने उद्योजकांची तब्बल ३९० कोटींची संपत्ती जप्त केली आहे. यात ५८ कोटी रुपये रोख स्वरूपात आहे. छापेमारीत आयकर विभागाला मोठ्या प्रमाणात रोख रक्कम मिळाली. ही रक्कम मोजण्यासाठी आयकरच्या अधिकाऱ्यांना तब्बल १३ तास लागले. आयकर विभागाने १ ते ८ ऑगस्ट दरम्यान ही कारवाई केलीये.










