Chief Justice Sanjiv Khanna : भारताचे 51 वे सरन्यायाधीश म्हणून संजीव खन्ना यांनी घेतली शपथ
सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड नुकतेच निवृत्त झाले होते. त्यानंतर त्यांनी खन्ना यांच्या नावाची शिफारस केली होती.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
संजीव खन्ना सर्वोच्च न्यायालयाचे नवे सरन्यायाधीश
कोण आहेत न्यायमूर्ती संजीव खन्ना?
डी. वाय. चंद्रचूड यांनी केली होती शिफारस
Justice Sanjiv Khanna Takes Oath As 51st Chief Justice Of India : भारताचे 51 वे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती संजीव खन्ना यांनी आज शपथ घेतली. राष्ट्रपती भवनात हा शपथविधी सोहळा पार पडला. सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड नुकतेच निवृत्त झाले होते. त्यानंतर त्यांनी खन्ना यांच्या नावाची शिफारस केली होती. डी. वाय. चंद्रचूड 10 नोव्हेंबर रोजी वयाच्या 65 व्या वर्षी या पदावरून निवृत्त झाले आहेत. त्यानंतर आता सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश म्हणून संजीव खन्ना यांनी शपथ घेतली. न्यायमुर्ती संजीव खन्ना यांचा जन्म 14 मे 1960 रोजी झाला असून, दिल्ली विद्यापीठाच्या कॅम्पस लॉ सेंटरमधून त्यांनी कायद्याचं शिक्षण घेतलं. दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणूनही त्यांनी काम पाहिलं आहे. त्यांनी राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाचे (NALSA) कार्यकारी अध्यक्ष म्हणूनही काम केलं आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >>Maharashtra Vidhan Sabha : राज्यात महायुती पुन्हा बाजी मारणार? मविआला किती जागा मिळणार? : IANS सर्व्हे
न्यायमूर्ती खन्ना हे जानेवारी 2019 पासून सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी ईव्हीएममध्ये पारदर्शकता ठेवणे, निवडणूक रोखे (Electoral Bonds) योजना रद्द करणे, कलम 370 रद्द करणे आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अंतरिम जामीन देण्यासारख्या अनेक महत्वपूर्ण निर्णयांचा ते एक भाग आहे.
हे वाचलं का?
न्यायमूर्ती संजीव खन्ना यांची कौंटुबिक पार्श्वभूमी
न्यायमूर्ती खन्ना हे दिल्ली उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती देव राज खन्ना यांचे पुत्र आहेत. तसंच सर्वोच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश एच. आर. खन्ना यांचे ते पुतणे आहेत. 18 जानेवारी 2019 रोजी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून पदोन्नती झालेले संजीव खन्ना हे उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्त होण्यापूर्वी वकील होते. वकिलीच्या क्षेत्रात त्यांची तिसरी पिढी होती. प्रलंबित खटल्यांचं प्रमाण कमी करण्यासाठी आणि लवकरात लव न्याय मिळावा अशी त्यांची भूमिका राहिली आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT