Loudspeaker Row : वसंत मोरेंनी राज ठाकरेंचा भोंग्यांबद्दलचा आदेश पाळला, पण…
मनसेचे मशिदींवरील भोंग्यांविरुद्धचं आंदोलन तीव्र झालेलं असताना चर्चा होतेय ती पुण्यातील मनसेचे नेते वसंत मोरे यांची. मनसेकडून ४ मे रोजी भोंग्यावरून अजान देणाऱ्या मशिदींसमोर हनुमान चालीसा वाजण्याचा इशारा देण्यात आलेला होता. मात्र, त्यापूर्वीच वसंत मोरे बालाजीच्या दर्शनाला निघून गेले. आता त्यांनी सोशल मीडियातून त्यांची भूमिका मांडली आहे. पण यात त्यांनी एक सलही बोलून दाखवली आहे. […]
ADVERTISEMENT

मनसेचे मशिदींवरील भोंग्यांविरुद्धचं आंदोलन तीव्र झालेलं असताना चर्चा होतेय ती पुण्यातील मनसेचे नेते वसंत मोरे यांची. मनसेकडून ४ मे रोजी भोंग्यावरून अजान देणाऱ्या मशिदींसमोर हनुमान चालीसा वाजण्याचा इशारा देण्यात आलेला होता. मात्र, त्यापूर्वीच वसंत मोरे बालाजीच्या दर्शनाला निघून गेले. आता त्यांनी सोशल मीडियातून त्यांची भूमिका मांडली आहे. पण यात त्यांनी एक सलही बोलून दाखवली आहे.
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याला झालेल्या मनसेच्या मेळाव्यात मशिदींवरील भोंग्यांचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यानंतर मनसेचे तत्कालिन शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी नाराजीचा सूर लावला होता. तेव्हापासून वसंत मोरे चर्चेत आहे.
सांगा वसंत कुणी हा पाहिला? पुणे मनसे कार्यालयावरच्या शुकशुकाटानंतर एकच चर्चा
राज ठाकरे यांनी वसंत मोरेंना घरी बोलवून चर्चाही केली होती. त्याचबरोबर त्यांना ठाण्याच्या सभेलाही बोलावलं होतं. मात्र, ठाण्याच्या सभेत बोलतानाही वसंत मोरेंची भूमिका कायम असल्याचं दिसलं. त्यानंतर औरंगाबादच्या सभेनंतर राज ठाकरेंनी ४ मेपासून आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला होता.