Devendra Fadnavis : महाविकास आघाडीचं सरकार बेईमानीचं, आमचं सरकार जनतेचं सरकार
राज्याचं अधिवेशन १७ ऑगस्टपासून सुरू होतं आहे. आम्ही विरोधकांना चहापानासाठी बोलावलं होतं. मात्र त्यांनी प्रथमेप्रमाणे सरकारच्या चहापानावर बहिष्कार घातला आहे. विरोधकांनी आम्हाला सात पानी पत्र दिलं आहे त्यातली चार पानं आम्ही दिलेल्या पत्रातलीच आहेत. त्यांना हा विसर पडला असेल की दीड महिन्यापूर्वीपर्यंत आपण सत्तेत होतो असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांच्या टीकेला उत्तर दिलं […]
ADVERTISEMENT
राज्याचं अधिवेशन १७ ऑगस्टपासून सुरू होतं आहे. आम्ही विरोधकांना चहापानासाठी बोलावलं होतं. मात्र त्यांनी प्रथमेप्रमाणे सरकारच्या चहापानावर बहिष्कार घातला आहे. विरोधकांनी आम्हाला सात पानी पत्र दिलं आहे त्यातली चार पानं आम्ही दिलेल्या पत्रातलीच आहेत. त्यांना हा विसर पडला असेल की दीड महिन्यापूर्वीपर्यंत आपण सत्तेत होतो असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांच्या टीकेला उत्तर दिलं आहे. एवढंच नाही तर बेईमानीने आलेल सरकार आमचं नाही तर महाविकास आघाडीचंच होतं असं म्हणत त्यांनी अजित पवारांही उत्तर दिलं आहे.
ADVERTISEMENT
आणखी काय म्हणाले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस?
विरोधी पक्षांचा शिंदे सरकारवर जरा जास्तच विश्वास दिसतो आहे. त्यामुळेच त्यांनी जे जे सरकारमध्ये असताना केलं नाही त्या अपेक्षा त्यांनी आमच्याकडून ठेवल्या आहेत असाही टोला देवेंद्र फडणवीस यांना लगावला. आमचं शिवसेना भाजप युतीचं सरकार विरोधकांच्या या अपेक्षा पूर्ण करेल असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
बेईमानाने आलेलं सरकार आम्हाला म्हणत आहेत हे आश्चर्य
आज अजित पवार म्हणाले की आमचं सरकार बेईमानीने आलेलं सरकार आहे. या गोष्टीचं आश्चर्य वाटलं. कारण २०१९ ला विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेनेला कौल देण्यात आला होता. मात्र महाविकास आघाडी हे बेईमानीने आलेलं सरकार होतं. आम्हाला मिळालेल्या जनमताच्याच नाही तर जनतेने दिलेल्या जनमताच्या पाठीत सुरा खुपसून महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं होतं असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ३२ दिवस त्या सरकारमध्ये विस्तार नव्हता. ३० डिसेंबरला विस्तार झाला. त्यानंतर ५ जानेवारीला खातेवाटप झालं. या सरकारला गझनीचा रोग जडला आहे. हे तीन पक्ष विरोधी पक्षात गेल्यानंतर तीन पक्षांच्या तीन दिशा बघायला मिळत आहेत अशीही टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.
अवघ्या ४६ दिवसांमध्ये लोकांना सरकारमधला फरक दिसतो आहे. सर्वसामान्यांचं सरकार आल्यासारखं वाटतं आहे. नाहीतर मंत्रालय रिकामं होतं, सह्याद्री रिकामं होतं. मंत्र्यांचे बंगलेही रिकामे होते. मात्र हे सरकार तसं नाही. आमचे लोक मैदानात उतरून काम करत आहेत. आज जे काही विरोधी पक्ष नेते म्हणाले की आम्हीच मदत जास्त केली त्याला काही अर्थ नाही असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. आमच्या सरकारने तातडीने मदत देऊ केली आहे. पुरवणी मागण्या मंजूर झाल्यानंतर जे वाटप आहे ते सुरू करू असंही देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT