आमदार अमोल मिटकरी हिंदू समाजाची माफी मागा, ब्राह्मण समाज समितीची एकमुखी मागणी

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांनी हिंदू समाजाबद्दल अपशब्द वापरून धार्मिक भावना दुखावल्याबद्दल त्यांच्या वर कारवाई करावी अशी मागणी सकल ब्राह्मण समाज समितीने केली आहे. एवढंच नाही तर मिटकरींनी हिंदू समाजाची माफी मागावी अशीही मागणी करण्यात आली आहे.

ADVERTISEMENT

ठाकरे, सोमय्या, फडणवीस; अमोल मिटकरींनी तिघांनाही घेरलं

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांनी इस्लामपूर येथे झालेल्या जाहीर सभेत हिंदू समाजाच्या चालीरीती आणि परंपरा यांची खिल्ली अमोल मिटकरींनी उडवली आहे. त्यामुळे समाजात सर्वत्र संतापाची भावना निर्माण झाली आहे. मिटकरी ही व्यक्ती राज्याचा जबाबदार आमदार असून, त्यांनी हिंदू समाजात पौरोहित्य करणाऱ्यां बाबत आणि विवाह परंपरेबाबत स्वतःला कुठलेही ज्ञान नसतांना चुकीचे विधान करून समाजाची खिल्ली उडवली आहे. त्यांनी अकारण जातीय तेढ निर्माण केली आहे. अशा प्रकारची कृती बालिश बुद्धीतून आणि अमानवीय आहे. याचा समस्त हिंदू बांधवांनी निषेध केला आहे. या घटनेबाबत अमोल मिटकरी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने हिंदू समाजाची जाहीर माफी मागावी अशी मागणी समस्त ब्राह्मण समाज समिती अंबाजोगाई आणि पेशवा युवा मंच यांनी एका निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. या निवेदनाच्या प्रती उपविभागीय अधिकारी अंबाजोगाई, पोलिस स्टेशन अंबाजोगाई यांच्याकडे देऊन कारवाई करण्याची मागणी केली आहे.

हे वाचलं का?

पंढरपूरमध्येही निषेध

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी सांगली येथे पार पडलेल्या सभेमध्ये ब्राह्मण समाजाची खिल्ली उडवली याच्या निषेधार्थ पंढरपूरमध्ये राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना ब्राह्मण समाजातील बांधवांनी श्री विठ्ठल मंदिरा बाहेर घेराव घालत आमदार मिटकरी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली.

ADVERTISEMENT

आमदार अमोल मिटकरी हे सातत्याने वादग्रस्त वक्तव्य करुन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. पक्षाने त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी ब्राह्मण समाज बांधवांनी पंढरपुरात खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे केली.

ADVERTISEMENT

दलित असो की ब्राह्मण सर्व भारतीयांचा DNA एकच-देवेंद्र फडणवीस

काय आहे प्रकरण?

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या इस्लामपूर येथे झालेल्या जाहीर सभेत आमदार अमोल मिटकरी यांनी हिन्दू समाजाच्या चालीरीती, मंत्रोच्चार याबाबत अपशब्द वापरून धार्मिक भावना दुखावल्या. तसंच सामाजिक द्वेष पसरवल्याबद्दल समाजाची जाहीर माफी मागावी अशी मागणी सकल ब्राह्मण समाज समिती अंबाजोगाई यांनी केली आहे.

काय म्हणाले होते अमोल मिटकरी?

“मी एका ठिकाणी गेलो होतो. कन्यादान होत होतं. मी म्हटलं अन्नदान ऐकलं, नेत्रदान ऐकलं, रक्तदान ऐकलं. कन्या काय दान करण्याचा विषय असतो का? म्हणे असतो ना.. नवरदेव पीएचडी, नवरी एम ए झालेली. लग्न लावणारे महाराज सांगत होते मम भार्या समर्पयामी. मी नवरदेवाच्या कानात सांगितलं अरे येड्या ते महाराज म्हणत आहेत मम म्हणजे माझी भार्या म्हणजे बायको समर्पयामी म्हणजे घेऊन जा.. आरारारा… कधी सुधारणार? ” असं वक्तव्य मिटकरींनी केलं होतं. त्यावरून खूप वाद निर्माण झाला आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT