Modi Government’s Cabinet Expansion: अवघ्या काही तासात शपथविधी, मोदी मंत्रिमंडळाच्या विस्ताराची तयारी पूर्ण
नवी दिल्ली: केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार (Cabinet Expansion) आज (7 जुलै) संध्याकाळी 6 वाजता होणार आहे. मोदी 2.0 सरकारचा हा पहिलाच मंत्रिमंडळ विस्तार आहे. अशावेळी मंत्रिमंडळात अनेक नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाचा (Modi Cabinet) हा विस्तार मोठा असल्याचं म्हटलं जात आहे. कारण यामध्ये अनेक मंत्री शपथ घेण्याची शक्यता आहे. दरम्यान, बुधवारी शपथ ग्रहणाआधी […]
ADVERTISEMENT

नवी दिल्ली: केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार (Cabinet Expansion) आज (7 जुलै) संध्याकाळी 6 वाजता होणार आहे. मोदी 2.0 सरकारचा हा पहिलाच मंत्रिमंडळ विस्तार आहे. अशावेळी मंत्रिमंडळात अनेक नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळाचा (Modi Cabinet) हा विस्तार मोठा असल्याचं म्हटलं जात आहे. कारण यामध्ये अनेक मंत्री शपथ घेण्याची शक्यता आहे. दरम्यान, बुधवारी शपथ ग्रहणाआधी संभाव्य मंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. मंत्रिमंडळात तरुण आणि नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार आहे. दरम्यान, आतापर्यंत काही केंद्रीय मंत्र्यांनी राजीनामा देखील दिला असल्याचं समजतं आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात महाराष्ट्राच्या वाट्याला चार मंत्रिपदं येण्याची दाट शक्यता आहे. त्यापैकी नारायण राणे आणि भिवंडीचे खासदार कपिल पाटील यांचं मंत्रिपद निश्चित झालं आहे. दुसरीकडे खासदार भागवत कराड आणि भारती पवार यांनाही मंत्रिपद मिळणार असल्याचं सूत्रांकडून समजतं आहे.
दरम्यान, पंतप्रधान मोदी यांनी संभावित मंत्र्यांसोबत एक बैठक केली असल्याचं समजतं आहे. पण त्याआधी कॅबिनेटमधील संतोष गंगवार, रमेश पोखरियाल निशंक, सदानंद गौडा, देबोश्री चौधरी, थावरचंद गहलोत आणि डॉ. हर्षवर्धन यांना मंत्रिमंडळातून डच्चू दिल्याचं समजतं आहे.