Sheena Bora Murder: इंद्राणीची अनेक लग्न ते शीना बोराच्या हत्येचं गूढ… प्रत्येक वेळी समोर आलेलं धक्कदायक सत्य!

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई: मुंबईतील शीना बोरा हत्याकांड हे असे एक हाय प्रोफाईल प्रकरण होते की, ज्याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिले होते. हे खून प्रकरण इतके गुंतागुंतीचे होते की शीनाचा मृतदेह सापडला तेव्हा असं सांगण्यात आलेलं की, ती इंद्राणीची बहीण आहे. मात्र जेव्हा खुलासा झाला तेव्हा ती इंद्राणीची बहीण नसून मुलगी असल्याचे समोर आलं होतं. ते देखील पहिल्या नवऱ्याकडून. ही नात्यांची अशी कथा आहे, ज्यात फसवणूक आहे, खोटं आणि बऱ्याच गोष्टी आहेत. जाणून घेऊयात नेमकं प्रकरण काय होतं.

या हत्याकांडाची कहाणी आम्ही आपल्याला सुरुवातीपासून सांगणार आहोत. शीनाची हत्या ही मुंबईतील हाय सोसायटीमधील एक प्रकारे ऑनर किलिंगचीच घटना होती. एका आईला आपल्या मुलीचा खून करावा लागला कारण ती ज्या मुलावर प्रेम करत होती तो तिचा सावत्र भाऊ होता. तपासादरम्यान, या प्रकरणात झालेले खुलासे हे अत्यंत धक्कादायक आणि प्रचंड गुंतागुंतीचे होते.

इंद्राणी हिने आपल्याच पोटच्या मुलीची हत्या का केली? तिच्या हत्येचा कट कसा रचला जाणून घ्या या हायप्रोफाईल प्रकरणाबाबत सविस्तरपणे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

या हत्याकांडाची कहाणी आम्ही आपल्याला सुरुवातीपासून सांगणार आहोत. शीनाची हत्या ही मुंबईतील हाय सोसायटीमधील एक प्रकारे ऑनर किलिंगचीच घटना होती. एका आईला आपल्या मुलीचा खून करावा लागला कारण ती ज्या मुलावर प्रेम करत होती तो तिचा सावत्र भाऊ होता. तपासादरम्यान, या प्रकरणात झालेले खुलासे हे अत्यंत धक्कादायक आणि प्रचंड गुंतागुंतीचे होते.

इंद्राणी हिने आपल्याच पोटच्या मुलीची हत्या का केली? तिच्या हत्येचा कट कसा रचला जाणून घ्या या हायप्रोफाईल प्रकरणाबाबत सविस्तरपणे.

ADVERTISEMENT

– 2 मे 2012 रोजी मुंबईपासून 103 किमी अंतरावर असलेल्या रायगड जिल्ह्यातील जंगलात एका महिलेच्या अर्धवट जळालेल्या मृतदेहाचे काही भाग सापडले होते. स्थानिक पोलीस मृताची ओळख पटवण्याचा प्रयत्न केले पण ते ओळख पटवू शकले नाही. त्यावेळी पोलिसांनी मृतदेहाच्या अवशेषांचे काही नमुने घेतले आणि ओळख पटत नसल्यामुळे आणि पुराव्यांअभावी पोलिसांनी त्या अर्धवट जळालेल्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करुन टाकले होते.

ADVERTISEMENT

– 21 ऑगस्ट 2015 रोजी मुंबई पोलिसांनी श्याम मनोहर राय नावाच्या 43 वर्षीय व्यक्तीला अटक केली. अवैध पिस्तूल बाळगल्याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली होती. चौकशीत या व्यक्तीने 2012 मध्ये एका खुनाच्या गुन्ह्यात सहभाग असल्याची कबुली दिली होती.

– एप्रिल 2012 मध्ये एका मुलीची हत्या करून तिचा मृतदेह रायगडच्या जंगलात जाळण्याचा आणि नंतर पुरण्याचा प्रयत्न केल्याचे श्याम मनोहर राय यांनी पोलिसांना सांगितले होते. या माहितीवरून मुंबई पोलिसांनी रायगड पोलिसांशी संपर्क साधला असता, मे 2012 मध्ये महिलेच्या जळालेल्या मृतदेहाचे अवयव प्रत्यक्षात सापडल्याचे समोर आले होते.

– यावेळी मुंबई पोलिसांचे एक पथक रायगडला गेले. तिथे रायच्या सांगण्यावरून त्यांनी जंगलात एके ठिकाणी खोदकाम केलं. यावेळी त्यांना महिलेच्या मृतदेहाचे काही अवशेष सापडले. तेव्हा पोलिसांना समजले की राय हा खरे बोलत आहे.

– मृतदेहाचे अवशेष सापडल्यानंतर मुंबई पोलीस श्याम मनोहर राय यांची पुन्हा चौकशी सुरु केली. तेव्हा त्याने सांगितलं की, काही वर्षांपूर्वी तो पीटर मुखर्जीची पत्नी इंद्राणी मुखर्जीचा ड्रायव्हर होता आणि इंद्राणीच्या सांगण्यावरूनच त्याने शीना बोरा नावाच्या महिलेची हत्या करून मृतदेह रायगडच्या जंगलात पुरला होता.

– याच खुलाशानंतर मुंबई पोलिसांनी इंद्राणी मुखर्जीला तिच्या मुंबईतील घरातून अटक केली होती. सुरुवातीला इंद्राणीने रायचे आरोप फेटाळलेच नाही तर शीना आपली बहीण असून ती तीन वर्षांपासून अमेरिकेत राहत असल्याचेही म्हटले होते. पण जेव्हा श्याम मनोहर राय आणि इंद्राणीला समोरासमोर बसवून चौकशी करण्यात आली तेव्हा मात्र, तिने आपला गुन्हा कबूल केला.

– पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इंद्राणी आणि शीनाचे संबंध चांगले नव्हते. 2012 मध्ये एके दिवशी इंद्राणीने वाद मिटवण्याच्या बहाण्याने शीनाला वांद्रे येथे भेटण्यासाठी बोलावले होते. मग तिला गाडीत बसवले. यावेळी कारमध्ये चालक श्याम राय व्यतिरिक्त आणखी एक व्यक्ती होती. यानंतर शीनाची गाडीतच गळा आवळून हत्या करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी इंद्राणीचा पूर्वाश्रमीचा पती संजीव खन्ना यालाही कोलकाता येथून अटक केली होती.

– इंद्राणीचा मुलगा आणि शीनाचा सख्खा भाऊ मिखाईल हा आपल्या आईला त्याच्या शीनाबद्दल अनेकदा विचारत असे, इंद्राणी त्याला नेहमी सांगायची की त्याची बहीण शीना ही अमेरिकेत शिकत आहे. मिखाईल बोराने दावा केला आहे की, त्याच्या बहिणीची हत्या का करण्यात आली हे त्याला माहीत आहे.

– याप्रकरणी पोलिसांनी इंद्राणीचा पती पीटर मुखर्जी आणि मुलगा राहुल यांचीही चौकशी केली होती. नंतर पोलिसांनी पीटरला देखील अटक केली होती. पीटर मुखर्जी हे भारतीय टीव्ही इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध नाव होते. पीटर हे स्टार इंडियाचे माजी सीईओ होते. 2002 मध्ये त्यांनी इंद्राणीशी लग्न केले होते. पीटरचे हे तिसरे लग्न होते. पीटर आयएनएक्स मीडियाचे अध्यक्षही होते. इंद्राणीने पीटरच्या आधीही दोन लग्न केली होती.

– इंद्राणी मुखर्जी आयएनएक्स ही INX मीडियाची सीईओ होती. इंद्राणीने पीटर मुखर्जीसोबत दुसरे लग्न केले होते. इंद्राणीने वृत्तवाहिन्यांसह अनेक चॅनेल्सही सुरू केले होते. 2009 मध्ये, इंद्राणी आणि पीटर यांनी एकत्र INX मीडियाला अलविदा केलं होतं.

Sheena Bora: ‘शीना बोरा जिवंत आहे’, इंद्राणी मुखर्जीचा दावा… मग रायगडच्या जंगलात सापडलेला मृतदेह कोणाचा?

– नंतर या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला होता. शीनाने मुंबईत फ्लॅटची मागणी केल्यामुळे तिची हत्या करण्यात आल्याचे तपास यंत्रणेने म्हटले आहे. सीबीआयच्या आरोपपत्रात शीना बोरा आपल्या आईला ब्लॅकमेल करत असल्याचे म्हटले आहे. इंद्राणी मुखर्जी आणि तिचा पती पीटर मुखर्जी देखील शीनाचं मुलगा राहुलसोबत असलेल्या अफेअरबद्दल देखील नाराज होते. या प्रकरणी सीबीआयने 52 साक्षीदार न्यायालयात हजर केले होते.

– तुरुंगात असताना इंद्राणी आणि पीटर यांच्यात घटस्फोट झाला. यानंतर, 6 फेब्रुवारी 2020 रोजी उच्च न्यायालयाने पीटर मुखर्जी यांना जामीन मंजूर केला. या प्रकरणात पीटरचा थेट संबंध नसल्याचे न्यायालयाने म्हटले. मात्र, न्यायालयाने इंद्राणीला जामीन देण्यास नकार दिला. इंद्राणीच्या वतीने अनेकवेळा जामीन अर्ज दाखल करण्यात आला. मात्र तिसा अद्यार जामीन मिळाला नाही. तो सध्या मुंबईतील भायखळा कारागृहात आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT