मुंबई लोकलचं दार आता विद्यार्थ्यांनासाठीही खुलं, महिन्याचा पास कसा काढाल जाणून घ्या
लॉकडाऊन झाल्यापासून म्हणजेच मागच्या दीड वर्षापासून शाळा आणि महाविद्यालयं बंद होती. ही शाळा महाविद्यालयं आता सुरू झाली आहेत. देशभरात लसीकरणाचं प्रमाण वाढलं आहे. 100 कोटी लसीकरणाचा टप्पा ओलांडण्यात आला आहे. अशात आता नियम शिथीलही होत आहेत. त्या अनुषंगानेच विद्यार्थ्यांना मुंबई लोकल मधून प्रवास करता येणार आहे. 15 ऑगस्ट 2021 पासून कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस […]
ADVERTISEMENT
लॉकडाऊन झाल्यापासून म्हणजेच मागच्या दीड वर्षापासून शाळा आणि महाविद्यालयं बंद होती. ही शाळा महाविद्यालयं आता सुरू झाली आहेत. देशभरात लसीकरणाचं प्रमाण वाढलं आहे. 100 कोटी लसीकरणाचा टप्पा ओलांडण्यात आला आहे. अशात आता नियम शिथीलही होत आहेत. त्या अनुषंगानेच विद्यार्थ्यांना मुंबई लोकल मधून प्रवास करता येणार आहे.
ADVERTISEMENT
15 ऑगस्ट 2021 पासून कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतलेल्यांना लोकलचा प्रवास करता येणार होता. आता महाविद्यालयं सुरू झाली आहेत. त्यामुळे महाविद्यालयीन विद्यार्थीही लोकलने प्रवास करू शकणार आहेत.
शाळा आणि महाविद्यालयं बंद असल्याने ऑनलाईन शिक्षण सुरू होतं. मात्र आता प्रत्यक्ष महाविद्यालयात जाता येणार असल्याने अनेक विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला आहे. दरम्यान मुंबई लोकलमधून आता विद्यार्थ्यांना प्रवास करता येणार आहे. ज्या विद्यार्थ्यांचं वय 18 पेक्षा कमी आहे आणि त्यांना लस मिळालेली नाही अशा मुलांनाही मुंबई लोकलने प्रवास करता येणं आता शक्य होणार आहे.
हे वाचलं का?
काय आहे प्रक्रिया ?
ADVERTISEMENT
ज्या विद्यार्थ्यांना लोकल प्रवास करायचा आहे त्यांनी आपल्या घराजवळ असलेल्या रेल्वे स्टेशनवर जायचं, त्यानंतर तिथे तिकिट खिडकीवर आपलं आधार कार्ड आणि महाविद्यालयाचं आय कार्ड दाखवायचं. ही तपासणी केल्यानंतर रेल्वे कर्मचारी या विद्यार्थ्यांना महिन्याचा पास देतील. विद्यार्थ्यांना रोज तिकीट घेण्यासाठी रांगेत उभं रहावं लागू नये म्हणून त्यांना हा पास मिळू शकतो. एका वेळी पास काढून विद्यार्थी प्रवास करू शकणार आहेत. समजा एखाद्या विद्यार्थ्याला महिन्याचा पास नको असेल तर तो तिकीटही काढू शकणार आहे.
ADVERTISEMENT
Mumbai Local : अठरा वर्षांखालील मुलांचा प्रवास सुसाट! आजपासून लोकल प्रवासाला परवानगी
मुंबईत कोरोनाने कहर माजवला होता. पहिल्या लाटेत धारावीमध्ये आणि दुसऱ्या लाटेत उच्चभ्रू वस्त्यांमध्ये कोरोनाचा कहर पाहण्यास मिळाला. त्यामुळे कायमच वेगाने धावणारी मुंबई ठप्प झालेलीही आपण सगळ्यांनी पाहिली. मात्र कोरोनाचा कहर जसा कमी झाला तसे आता निर्बंधही शिथील होत आहेत. २२ ऑक्टोबर म्हणजेच शुक्रवारपासून राज्यात सिनेमा थिएटर्स आणि नाट्यगृहं देखील सुरू होत आहेत. या सगळ्या अनुषंगाने मुंबई पुन्हा रूळावर आली आहे असं म्हणता येऊ शकतं. विद्यार्थ्यांना म्हणजेच ज्यांचे लसीचे दोन डोस झाले नाहीत अशांनाही आता लोकल प्रवास करता येणार आहे. मात्र त्यासाठी आधार कार्ड आणि महाविद्यालयाचे ओळखपत्र जवळ असणं अत्यंत आवश्यक आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT