मी अमित शाहांना तक्रार करणार, अनिल देशमुखांप्रमाणे मलाही अडकवलं जातंय – नवाब मलिक
राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक यांनी केंद्रीय तपास यंत्रणांवर गंभीर आरोप केले आहेत. केंद्रीय तपास यंत्रणा लोकांना माझ्याविरोधात खोट्या तक्रारी करायला भाग पाडत आहेत, अनिल देशमुखांप्रमाणे मलाही अडकवण्याचा प्रयत्न केला जात असून याचे पुरावे आपल्याकडे आहेत, ज्याबद्दल मी अमित शहांना तक्रार करणार असल्याचं मलिक यांनी म्हटलं आहे. दोन महिन्यांपासून आम्ही आर्यन खान प्रकरणातील चुकीच्या गोष्टींविरोधात […]
ADVERTISEMENT
राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक यांनी केंद्रीय तपास यंत्रणांवर गंभीर आरोप केले आहेत. केंद्रीय तपास यंत्रणा लोकांना माझ्याविरोधात खोट्या तक्रारी करायला भाग पाडत आहेत, अनिल देशमुखांप्रमाणे मलाही अडकवण्याचा प्रयत्न केला जात असून याचे पुरावे आपल्याकडे आहेत, ज्याबद्दल मी अमित शहांना तक्रार करणार असल्याचं मलिक यांनी म्हटलं आहे.
ADVERTISEMENT
दोन महिन्यांपासून आम्ही आर्यन खान प्रकरणातील चुकीच्या गोष्टींविरोधात आवाज उठवायला सुरुवात केली. तेव्हापासून माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर पाळत ठेवली जात आहे. याबाबत आमच्या हितचिंतकांनी एकाचा पाठलाग केला तेव्हा ते पळाले. या संशयिताची माहिती मी ट्विटरवर दिली आहे. या लोकांचं ट्विटर हँडल पाहिलं की ते भाजपशी संबंधित असल्याचं कळतंय. अनिल देशमुख यांच्यासोबत जसा खेळ झाला तसंच सुरु आहे. याबाबत माझ्याकडे माहिती आली असून मी ती पोलिसांना देणार असल्याचं नवाब मलिक म्हणाले.
माझ्या विरोधात केंद्रीय यंत्रणेचे अधिकारी लोकांना व्हॉटस्अॅपद्वारे मसुदा तयार करून पाठवतात आणि त्यांच्या इ- मेलच्या माध्यमातून माझ्या विरोधात खोटी तक्रार करायला लावत आहेत.त्याचेही पुरावे माझ्याकडे आहेत.याबाबत मी पोलीस आयुक्त व अमित शहांकडे सुद्धा तक्रार करणार आहे. pic.twitter.com/ybRYxQYcRm
— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) November 27, 2021
केंद्रीय यंत्रणेच्या माध्यमातून जर मंत्र्यांवर असे डाव खेळले जात असतील, त्यांना घाबरवलं जात असेल तर हे सहन केलं जाणार नाही. माझ्याकडे केंद्रीय अधिकाऱ्यांचे What’s App चॅट आहेत, मी याबाबत अमित शहांना तक्रार करणार असल्याचंही नवाब मलिकांनी स्पष्ट केलं.
हे वाचलं का?
“अनिल देशमुख यांच्याविरोधात ज्या पद्धतीने खोटी तक्रार करून त्यांच्याविरोधात कारवाई सुरू झाली, तसंच माझ्याबाबत केलं जातंय. माझ्या हाती याविषयी पुरावे लागले आहेत. केंद्रीय यंत्रणांचे काही अधिकारी स्वतः लोकांना माझ्याविरोधात मसुदा तयार करून पाठवत आहेत. त्यांना ईमेल आयडी देत आहेत. त्यांना माझ्याविरोधात खोट्या तक्रारी करायला लावत आहेत. याचे पुरावे माझ्या हाती लागले आहेत. या प्रकरणी मी पोलिसांकडे तक्रार करणार आहे. याची सखोल चौकशी झाली पाहिजे.”
फडणवीस-शाहांच्या भेटीत पवारांची एंट्री, Nawab Malik म्हणतात हा BJP IT Cell चा फर्जीवाड़ा
ADVERTISEMENT
दरम्यान काही दिवसांपूर्वी अमित शाहांनी आपल्या ट्विटरवर काही व्यक्तींचे फोटो पोस्ट केले होते. ज्यात मलिक यांनी, गाडीत बसलेले हे लोक मागील काही दिवसांपासून माझं घर आणि शाळेची ‘रेकी’ करत आहेत. जर कुणी यांना ओळखत असेल तर मला माहिती द्या. या फोटोत असलेल्या लोकांनी मला येऊन भेटावं, मी सर्व माहिती देतो असंच माझं त्यांना सांगणं आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT