पंकजा मुंडेंना धक्का : पांगरी जिंकत धनंजय मुंडेंनी दुसऱ्यांदा राखला ‘गोपीनाथ गड’

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बीड : जिल्ह्याच्या राजकारणात मुंडे विरुद्ध मुंडे या भावंडांमधील संघर्ष कायमचं टोकाचा राहिला आहे. स्थानिक निवडणुका असो की विधानसभा, लोकसभेच्या निवडणुका. भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्यातील संघर्ष प्रत्येक निवडणुकीत पाहायला मिळतो. अशातच आता बीड जिल्ह्याच्या राजकाणात महत्वाची मानली जाणारी ‘पांगरी’ गावची ग्रामपंचायत दुसऱ्यांदा धनंजय मुंडे यांच्या ताब्यात गेली आहे. पंकजा मुंडे यांना हा मोठा धक्का मानला जात आहे.

ADVERTISEMENT

राज्यासह बीड जिल्ह्यात सध्या ग्रामपंचायत निवडणुकांचं वारं वाहतं आहे. बीड जिल्ह्यातील ७०४ ग्रामपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम सुरू आहे. आज (बुधवार) नामनिर्देशन पत्र मागे घेण्याचा अंतिम दिवस होता. याच दिवशी जिल्ह्याच्या राजकाणात महत्वाची मानली जाणारी ‘पांगरी’ ही ग्रामपंचायत दुसऱ्यांदा धनंजय मुंडे यांच्या ताब्यात गेली आहे. पांगरी ग्रामपंचायतीच्या अंतर्गत वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना आणि दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांचे स्मृतीस्थळ गोपीनाथ गड आहे. 

धनंजय मुंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष वाल्मिकराव कराड यांच्या प्रयत्नाने पांगरी ग्रामपंचायतीच्या ११ जागा पैकी १० जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत. यामध्ये सरपंच पदी सुशिल वाल्मिकराव कराड यांचीही बिनविरोध निवड झाली आहे. या निकालानंतर जल्लोषात परळीतील राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेर नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी गुलाल उधळत सुशिल कराड यांना शुभेच्छा दिल्या. २०१७ सालीही ग्रामपंचायत धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांच्याकडून जिंकली होती.

हे वाचलं का?

यापूर्वी राज्यात जानेवारी २०२१ ते सप्टेंबर २०२२ या दरम्यानच्या कालावधीत मुदत संपलेल्या २०५३ ग्रामपंचायतींची निवडणूक पार पडली. त्यानंतर आता निवडणूक आयोगाने ऑक्टोबर २०२२ ते डिसेंबर २०२२ या कालावधीत मुदत संपणाऱ्या आणि नव्याने अस्तित्वात आलेल्या ३४ जिल्ह्यांमधील ३४० तालुक्यांतील ७ हजार ७५१ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT