NCP MLA Accident : संग्राम जगताप यांच्या BMW चा भीषण अपघात, चारही एअरबॅग्ज उघडल्या

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांच्या BMW कारला भीषण अपघात झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की कारचा या अपघातात चक्काचूर झाला आणि चारही एअरबॅग्ज उघडल्या. पहाटे ५.३० च्या सुमारास ही घटना घडली. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप थोडक्यात बचावले आहे.

ADVERTISEMENT

मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात; ड्रायव्हरचा जागीच मृत्यू, सातजण जखमी

संग्राम जगताप हे अहमदनगरमधले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत. मुंबई पुणे एक्स्प्रेसवर रसायनीच्या जवळ एसटी आणि त्यांच्या बीएमडब्ल्यू कारचा अपघात झाला. या अपघातातून संग्राम जगताप थोडक्यात बचावले आहेत. या अपघातात सुदैवाने कुणीही जखमी झालं नाही. आमदार संग्राम जगताप पुण्याहून मुंबईकडे येत असताना हा भीषण अपघात झाला. हा अपघात इतका भयंकर होता की कारचा चक्काचूर झाला.

हे वाचलं का?

Nagpur Accident : नागपूरमध्ये कार-ट्रकचा भयंकर अपघात, ७ प्रवासी जागीच ठार

मुंबईकडे येणाऱ्या मार्गावर एसटी आणि बीएमडब्ल्यू कार यांचा अपघात झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. रसायनी पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली आहे. संग्राम जगताप यांची बीएमडब्ल्यू कार आणि एसटी बसची समोरासमोर धडक झाली. या अपघातात जगताप यांच्या कारचा चुराडा झाला आहे. मात्र, संग्राम जगताप या अपघातातून थोडक्यात बचावले आहेत. त्यांना कोणत्याही प्रकारची इजा झालेली नाही.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT