रामदास कदम-अनिल परब वादात नवा ट्विस्ट, RTI कार्यकर्ते रिझवान काझी यांनी केला ‘हा’ दावा

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

किरिट सोमय्या यांना अनधिकृत बांधकामाबाबत रसद रामदास कदम किंवा इतर कुणी नव्हे तर मी पुरवली असा दावा दापोलीतील आरटीआय कार्यकर्ते रिझवान काझी यांनी केला आहे. माहितीच्या अधिकारात मागवलेल्या कागदपत्रांसोबत रिझवाना काझी यांनी हा गौप्यस्फोट केला आहे.

ADVERTISEMENT

Ramdas Kadam: ‘किरीट सोमय्याचं थोबाडही पहिलेलं नाही आणि इच्छाही नाही’, रामदास कदम का संतापले?

17 मार्च 2017 पासून अनेक कार्यालयामध्ये वादग्रस्त रिसॉर्ट संदर्भात माहितीच्या अधिकारात आपण माहिती मागवली होती असंही त्यांनी म्हटलं आहे. मिळालेली माहिती आपण किरिट सोमय्या यांना पुरवल्याचंही रिझवान यांनी सांगितलं आहे. तसंच आता या प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

हे वाचलं का?

शिवसेना नेते रामदास कदम आणि परिवहन मंत्री अनिल परब वादात नवीन ट्विस्ट पहायला मिळत आहे. किरिट सोमय्या यांना दापोलीतील साई रिसॉर्टच्या अनधिकृत बांधकामाबाबत रसद रामदास कदम किंवा इतर कुणी नव्हे तर आपण पुरवली असा दावा दापोलीतील आरटीआय कार्यकर्ते रिझवान काझी यांनी केला आहे. माहितीच्या अधिकारात मागवलेल्या कागदपत्रांसोबत आरटीआय कार्यकर्ते रिझवाना काझी यांनी हा गोप्यस्फोट केला आहे. दापोलीत पत्रकार परिषद घेऊन त्यांनी ही माहिती दिली.

ADVERTISEMENT

याबाबत बोलताना काझी यांनी सांगितलं की, 17 मार्च 2017 पासून अनेक कार्यालयामध्ये वादग्रस्त साई रिसॉर्ट संदर्भात माहितीच्या अधिकारात माहिती मागवली. मिळालेली माहिती आपण किरिट सोमय्या यांना पुरवली त्याचे दाखले आरटीआाय कार्यकर्ते रिझवान काझी यांनी दिले आहेत. तर दापोलीतील आरटीआय कार्यकर्ते प्रसाद कर्वे यांना आपणच भाजप नेते किरिट सोमय्यांचा मोबाईल नंबर दिल्याचे पुरावे त्यांनी सादर केले. शिवसेना नेते रामदास कदम आणि दापोलीतील आरटीआय कार्यकर्ते प्रसाद कर्वे यांच्यातील संभाषण व्हायरल झालं होतं.

ADVERTISEMENT

शिवसेना नेते रामदास कदम यांनी अनिल परब यांच्या विरोधात सोमय्या यांना रसद पुरवल्याचे आरोप झाले. शिवसेना नेते रामदास कदम यांच्या मुंबईतल्या खळबळजनक पत्रकार परिषदेनंतर दापोलीतील आरटीआय कार्यकर्ते रिझवान काझी पुढे आलेत. वादग्रस्त साई रिसॉर्ट प्रकरणात किरिट सोमय्या यांना रामदास कदम यांनी रसद पुरवल्याचा आरोप झाले होते. काल शिवसेना नेते रामदास कदम यांनी हे आरोप फेटाळल्यानंतर आता हे प्रकरण उकरून काढणारे आरटीआय कार्यकर्ते समोर आलेत. रिझवान काझी यांनी मुरुड येथील वादग्रस्त साई रिसॉर्ट प्रकरणात पहिल्यांदा माहितीचा अधिकार टाकल्याचा दावा केलाय. त्याचे कागदोपत्री पुरावे देत वादग्रस्त साई रिसॉर्ट प्रकरण मागे राहिलं आणि राजकारण खेळलं जात असल्याची खंत आरटीआय कार्यकर्ते रिझवान काझी यांनी व्यक्त केली.

किरिट सोमय्या यांना माहितीच्या अधिकारात माहिती मिळाल्यानंतर आपण या प्रकरणातील सर्व माहिती भाजप नेते किरिट सोमय्या यांना पुरवल्याचा दावा रिझवान काझी यांनी केला आहे. वादग्रस्त साई रिसॉर्ट प्रकरणातील माहितीच्या अधिकारात मिळालेली कागदपत्रं घेऊन आपण मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याची माहिती काझी यांनी दिली आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT