मोक्काच्या आरोपीला नितीन राऊतांच्या मुलाकडून आश्रय; राष्ट्रवादीचा मित्रपक्षाच्या नेत्यावर आरोप

मुंबई तक

– योगेश पांडे, नागपूर प्रतिनिधी राज्यात सत्तेत असलेल्या महाविकास आघाडी सरकारमधील घटक पक्षांमधला वाद आणि सुंदोपसुंदी काहीकेल्या थांबायचं नाव घेत नाहीये. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील वादाचा नवीन अंक नागपूरमध्ये पहायला मिळत आहे. ज्यात उर्जामंत्री नितीन राऊत यांचा मुलगा कुणाल राऊतने मोक्काच्या आरोपात फरार असलेल्या आरोपीला दीड वर्षांपासून आश्रय दिल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या अर्बन सेलच्या […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

– योगेश पांडे, नागपूर प्रतिनिधी

राज्यात सत्तेत असलेल्या महाविकास आघाडी सरकारमधील घटक पक्षांमधला वाद आणि सुंदोपसुंदी काहीकेल्या थांबायचं नाव घेत नाहीये. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील वादाचा नवीन अंक नागपूरमध्ये पहायला मिळत आहे. ज्यात उर्जामंत्री नितीन राऊत यांचा मुलगा कुणाल राऊतने मोक्काच्या आरोपात फरार असलेल्या आरोपीला दीड वर्षांपासून आश्रय दिल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या अर्बन सेलच्या अध्यक्षा ज्वाला धोटे यांनी केला आहे.

कुणाल राऊत हे राज्य युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष असून ज्वाला धोटे या विदर्भवादी नेते जांबुवंत धोटे यांच्या कन्या आहेत. या आरोपांमुळे नागपूर शहरात चर्चांना उधाण आलं आहे.

ज्वाला धोटे यांनी नागपुरात पत्रकार परिषद घेऊन हे आरोप केले आहेत. अभिषेक सिंग असं या आरोपीचं नाव असून त्याच्यावर मोक्काअंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. गेल्या दीड वर्षांपासून तो फरार असून राऊत पितापुत्रांसोबत हा आरोपी अनेक कार्यक्रमांमध्ये फिरत असल्याचा आरोप ज्वाला धोटे यांनी केला आहे. ज्वाला धोटे यांनी अभिषेक सिंग यांचा कुणाल आणि नितीन राऊत यांच्यासोबतचे फोटोही या पत्रकार परिषदेत दाखवले.

हे वाचलं का?

    follow whatsapp