धक्कादायक! ‘या’ लॅबवर कारवाई, कोरोना चाचणीस बंदी; कारण…
नाशिक: शासकीय कोरोना टेस्टिंग लॅबच्या अहवालापेक्षा खासगी लॅबमध्ये कोरोना पॉझिटिव्हचे आकडे जादा दाखवल्याचे जिल्हा रुग्णालयाच्या तपासणीत निष्पन्न झाले असून जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दातार जनेटिक्स लॅबला पुढील आदेश येइपर्यंत कोरोना स्वॅब टेस्टिंग करण्यास बंदी घातली आहे. तसेच याप्रकरणी शहरातील सुप्रीम डायग्नोस्टिक व ठाण्यातील तुर्भे येथील थारोकेअर लॅबमधील अहवालाची फेर तपासणी करुन अहवाल सादर करण्याचे आदेश […]
ADVERTISEMENT

नाशिक: शासकीय कोरोना टेस्टिंग लॅबच्या अहवालापेक्षा खासगी लॅबमध्ये कोरोना पॉझिटिव्हचे आकडे जादा दाखवल्याचे जिल्हा रुग्णालयाच्या तपासणीत निष्पन्न झाले असून जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दातार जनेटिक्स लॅबला पुढील आदेश येइपर्यंत कोरोना स्वॅब टेस्टिंग करण्यास बंदी घातली आहे. तसेच याप्रकरणी शहरातील सुप्रीम डायग्नोस्टिक व ठाण्यातील तुर्भे येथील थारोकेअर लॅबमधील अहवालाची फेर तपासणी करुन अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हा शल्य चिकित्सक व महापालिका आरोग्य अधिकारी यांना दिले आहेत.
मागील काही दिवसांपासून शहर व जिल्ह्यात करोना पॉझिटिव्ह रुग्णाचा आकडा आश्चर्यकारकरित्या वाढला आहे. शासकीय लॅबपेक्षा खासगी लॅबमध्ये स्वॅब टेस्टिंगमध्ये तुलनेने पॉझिटिव्हचे आकडे जादा असल्याचे समोर येत होते. खासगी लॅब करोना संकटाची संधी साधत आकडे फुगवून दाखवत असल्याची चर्चा होती. शेवटी याप्रकरणी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी शासकीय व खासगी लॅबमधील आकडेवारीची तपासणी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार दातार जनेटिक्स लॅबमधील स्वॅब टेस्टिंग केलेल्या रुग्णांची जिल्हा रुग्णालयाकडे फेरतपासणी केले असता १६ पैकी ७ रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले. तसेच सुप्रीम डायग्नोस्टिक या लॅबचे पॉझिटिव्ह रेट अवाजवी असल्याचे निष्पन्न झाले आहे. तर थाअरोकेअर ही प्रयोगशाळा तुर्भे येथे असल्याने ठाणे येथील जिल्हाधिकार्यांना स्वॅब टेस्टिंगची फेरतपासणीचे पत्र देण्यात आले आहेत.
दातार जनेटिक्स याप्रकरणात दोषी आढळल्याने पुढील आदेश येईपर्यंत या ठिकाणी करोना स्वॅब टेस्टिंगवर बंदी घालण्यात आली आहे. तसेच दातार जेनेटिक्स लॅब कायमस्वरुपी बंद करण्यात का येऊ नये? याबबतचा खुलासा मागविण्यात आला आहे. तसेच सुप्रीम डायग्नोस्टिक लॅबमधील स्वॅबची फेरतपासणीचे आदेश जिल्हा शल्य चिकित्सक व महापालिका आरोग्य अधिकारी यांना देण्यात आले आहेत.
फेरतपासणीमध्ये असे निघाले निष्कर्ष