ONGC हेलिकॉप्टरचं अरबी समुद्रात इमर्जन्सी लँडिंग, चार जणांचा मृत्यू तर पाच जण वाचले
ओएनजीसीच्या (ONGC) पवनहंस हेलिकॉप्टरचं मुंबईजवळच्या अरबी समुद्रात इमर्जन्सी लँडिंग करावं लागलं. त्यावेळी जो अपघात झाला त्यात चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर पाच जणांना वाचवण्यात यश आलं आहे. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. हेलिकॉप्टरमध्ये दोन पायलट तसंच ओनएनजीसीचे सात कर्मचारी होते. एकूण ९ लोक होते ज्यापैकी पाच लोकांना वाचवलं गेलंय. मुंबई : शिवसेना खासदाराच्या गाडीवर […]
ADVERTISEMENT
ओएनजीसीच्या (ONGC) पवनहंस हेलिकॉप्टरचं मुंबईजवळच्या अरबी समुद्रात इमर्जन्सी लँडिंग करावं लागलं. त्यावेळी जो अपघात झाला त्यात चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर पाच जणांना वाचवण्यात यश आलं आहे. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. हेलिकॉप्टरमध्ये दोन पायलट तसंच ओनएनजीसीचे सात कर्मचारी होते. एकूण ९ लोक होते ज्यापैकी पाच लोकांना वाचवलं गेलंय.
ADVERTISEMENT
मुंबई : शिवसेना खासदाराच्या गाडीवर कोसळलं झाड
मुंबईतल्या पश्चिमेकडच्या सागर किरण ऑईल रिगजवळ ही दुर्घटना घडली. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार फ्लोटर्सच्या सहाय्याने हेलिकॉप्टरला काही वेळ बुडण्यापासून वाचवण्यात य़श आलं त्यामुळेच हेलिकॉप्टरमधल्या पाचजणांना वाचवण्यात यश आलं. या सगळ्यांवर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. नौदलाच्या एका हेलिकॉप्टरमधून या सगळ्यांना घेऊन जात रूग्णालयात दाखल करण्यात आलं.
हे वाचलं का?
मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात; ड्रायव्हरचा जागीच मृत्यू, सातजण जखमी
नौदलाने मुंबईपासून 60 नॉटिकल मैल दूर ओएनजीसीच्या हेलिकॉप्टरमधील प्रवाशांना वाचवण्यासाठ एएलएच हेलिकॉप्टर आणि भारतीय नौदलाच्या जहाज तेगची मदत घेतली. तसेच एका जहाजाला मुंबईतून बचावासाठी आणखी एका जहाजाची मदत असल्याचे सांगितले आणि यशस्वीरित्या बचावकार्य राबवले.
ADVERTISEMENT
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोस्ट गार्डच्या (Coast Guard) विमानांनी लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी लाईफ राफ्ट समुद्रात सोडले. समुद्र बचाव समन्वय केंद्राने (Mumbai) आंतरराष्ट्रीय (International Security) नेटला देखील सक्रिय केले. दरम्यान, कोणत्या परिस्थितीत इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. ओएनजीसीची अरबी समुद्रात अनेक रिग आहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT