Petrol-Diesel Price : मुंबईसह महाराष्ट्रात डिझेलचाही भडका ; कोणत्या शहरात किती आहेत दर?
देशात पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून इंधनाच्या दरात सातत्याने वाढ होत असून, महागाईच्या झळा सोसणाऱ्या सर्वसामान्यांवर आता इंधन दरवाढीचाही बोझा पडू लागला आहे. शनिवारी इंधनाच्या दरात वाढ झाल्यानं राज्यातील सर्वच शहरातील इंधनाचे दर विक्रमी उच्चांकावर पोहोचले. (petrol diesel price hiked today 23 october) पेट्रोल-डिझेलचे दर दररोज विक्रमी झेप घेत असून, आज सलग […]
ADVERTISEMENT

देशात पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून इंधनाच्या दरात सातत्याने वाढ होत असून, महागाईच्या झळा सोसणाऱ्या सर्वसामान्यांवर आता इंधन दरवाढीचाही बोझा पडू लागला आहे. शनिवारी इंधनाच्या दरात वाढ झाल्यानं राज्यातील सर्वच शहरातील इंधनाचे दर विक्रमी उच्चांकावर पोहोचले. (petrol diesel price hiked today 23 october)
पेट्रोल-डिझेलचे दर दररोज विक्रमी झेप घेत असून, आज सलग चौथ्या दिवशी तेल वितरण कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ केली. पेट्रोल आणि डिझेलचे दर लिटरमागे 35 पैशांनी वाढले असून, त्यामुळे देशातीप प्रमुख शहरांसह राज्यातील सर्वच शहरातील इंधन दरात मोठी वाढ झाली आहे.
तेल वितरक कंपनी इंडियन ऑईल कॉर्पोरेशनच्या माहितीप्रमाणे दिल्लीत पेट्रोलचे दर विक्रमी पातळीवर म्हणजे प्रतिलिटर 107.24 रुपयांवर पोहोचले आहेत. तर मुंबईत एक लिटर पेट्रोलसाठी 113.12 पैसे मोजावे लागत आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत डिझेलच्या किंमतीही पेट्रोल दराचे बोट धरून प्रचंड वाढल्या आहेत. मुंबईत डिझेलचे दर 104 रुपये प्रतिलिटरवर गेले आहेत.
राज्यातील प्रमुख शहरातील इंधनाचे दर (प्रतिलिटर रुपयांमध्ये)