Narendra Modi: “वीर सावरकर तुरुंगात बेड्या चिपळ्यांप्रमाणे वाजवत,तुकोबांचे अभंग म्हणत”

मुंबई तक

देहूचं शिळा मंदिर हे फक्त भक्तीचं केंद्र नाही तर भारताच्या सांस्कृतिक भविष्याचं मार्ग प्रशस्त करणारं केंद्र आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. या पवित्र मंदिराची पुनर्बांधणी केल्याबद्दल मी मंदिर ट्रस्ट आणि सर्व भक्तांचे आभार मानतो असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. वीर सावरकरांबाबतही एक महत्त्वाचं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं आहे. काय […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

देहूचं शिळा मंदिर हे फक्त भक्तीचं केंद्र नाही तर भारताच्या सांस्कृतिक भविष्याचं मार्ग प्रशस्त करणारं केंद्र आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. या पवित्र मंदिराची पुनर्बांधणी केल्याबद्दल मी मंदिर ट्रस्ट आणि सर्व भक्तांचे आभार मानतो असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. वीर सावरकरांबाबतही एक महत्त्वाचं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं आहे.

काय म्हणाले आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी?

”संत हे आपल्यात असलेल्या उर्जेचा स्रोत असतात. ते विविध परिस्थितींमध्ये समाजाला गती देतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यात तुकाराम महाराजांचं मोठं स्थान आहे. एवढंच नाही तर स्वातंत्र्यवीर सावरकर यांना जेव्हा शिक्षा झाली तेव्हा त्यांना तुरुंगात ठेवण्यात आलं होतं. त्यावेळी हातातल्या बेड्या ते चिपळ्यांप्रमाणे वाजवत आणि तुकारामांचे अभंग गात असत” असा उल्लेख आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या भाषणात केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देहूतल्या शिळा मंदिराचं लोकार्पण करण्यात आलं त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. संत तुकाराम महाराज यांनी त्यांच्या आयुष्यात दुष्काळासारखे कठीण प्रसंग पाहिले. अशा प्रसंगात त्यांनी आपल्या घरातली दौलत लोकांमध्ये वाटली. तसंच समाजाला दिशा देण्याचं काम केलं. त्यांच्या याच त्यागाचं प्रतीक हे मंदिर आहे.

तुकाराम महाराजांनी जे अभंग रचले त्या अभंगांनी समाज बांधणीचं काम केलं. समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत तळागाळापर्यंत पोहचण्याचं काम तुकोबारायांनी केलं होतं. त्याच मार्गावर आपलं सरकार काम करतं आहे असंही सबका साथ सबका विकास या मंत्रावर आपण सध्या काम करतो आहोत त्यामागे हीच प्रेरणा आहे असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.

नरेंद्र मोदी यांनी असं म्हटलं आहे की, मनुष्यजन्मात संतांचा सत्संग हा दुर्लभ असतो असे आपल्या शास्त्रात सांगितले आहे. संतांची कृपा झाली, तर भगवंताचा साक्षात्कार आपोआप होतो. आज देहू या पवित्र तीर्थक्षेत्री येताना मलाही असंच वाटतं आहे. देहूचे शिळा मंदिर हे केवळ भक्तीचे केंद्रच नाही तर भारताच्या सांस्कृतिक भविष्याचा मार्गही प्रशस्त करते. या पवित्र स्थानाची पुनर्बांधणी केल्याबद्दल मी मंदिर ट्रस्ट आणि सर्व भक्तांचे आभार मानतो.

“मोदी म्हणाले अजितदादांना बोलू द्या, पण…” वाचा देहूतल्या कार्यक्रमात स्टेजवर नेमकं काय घडलं?

संत तुकाराम महाराजांचा दयाळूपणा, करुणा आणि सेवेची जाणीव त्यांच्या अभंगांच्या रूपात अजूनही आहे. या अभंगांनी आपल्या पिढ्यांना प्रेरणा दिली आहे. जे नष्ट होत नाही, जे शाश्वत राहते आणि काळाबरोबर संबंधित असते, ते अखंड असतं असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp