अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; विश्वास संपादन करून तिच्या घरातील २१ तोळे सोन्यावर डल्ला
राज्यात पोलीस यंत्रणांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आणखी एक घटना समोर आली आहे. पुणे जिल्ह्यातील आळेफाटा येथे एका अल्पवयीन मुलीचा विश्वास संपादन करुन आर्थिक अडचणीचे कारण सांगत तिच्या घरातील २१ तोळे सोन्यावर आरोपीने डल्ला मारला आहे. अल्पवयीन मुलीला लग्नाचं आमिष दाखवून तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला आळेफाटा पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. विक्रम […]
ADVERTISEMENT
राज्यात पोलीस यंत्रणांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आणखी एक घटना समोर आली आहे. पुणे जिल्ह्यातील आळेफाटा येथे एका अल्पवयीन मुलीचा विश्वास संपादन करुन आर्थिक अडचणीचे कारण सांगत तिच्या घरातील २१ तोळे सोन्यावर आरोपीने डल्ला मारला आहे. अल्पवयीन मुलीला लग्नाचं आमिष दाखवून तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला आळेफाटा पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे.
ADVERTISEMENT
विक्रम डोंगरे असं या आरोपीचं नाव आहे. २४ एप्रिल २०२० ते ऑगस्ट २०२१ या कालावधीत आरोपी विक्रम डोंगरे याने अल्पवयीन मुलीवर वेळोवेळी बलात्कार केला. तसेच तिला विश्वासात घेत आर्थिक अडचण सांगून तिच्या आजीचे, आईचे व मावशीचे अंदाजे आठ लाख रुपये किमतीचे तब्ब्ल २१ तोळे सोने लंपास केले.
धक्कादायक ! दुचाकी अडवत महिलेला कारमध्ये टाकलं, बलात्कार करत काढले अश्लील फोटो, नाशिक हादरलं
हे वाचलं का?
दरम्यान मुलीच्या आजीला घरातील सोन्याचे दागिने दिसले नसल्याने संबंधित प्रकार उघडकीस आला. याबाबत शुक्रवारी (१० सप्टेंबर) पीडित मुलीने वरील प्रकार पोलिसांना सांगितला, त्यानुसार पीडितेच्या आईच्या तक्रारीवरून आळेफाटा पोलिसांनी आरोपी विक्रम डोंगरे विरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला.
Ulhasnagar Rape Case: स्कायवॉकवर CCTV ची वानवा, प्लॅटफॉर्मवर पोलीस नाही ! रेल्वे पोलिसांकडून हतबलता व्यक्त
ADVERTISEMENT
पोलिसांनी मोठ्या शिताफीने तात्काळ आरोपीला अटक केली असून त्याला कोर्टाने तीन दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. पोलीस निरीक्षक मधुकर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक एस.एस.बडगुजर पुढील तपास करीत आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT