Rahul Gandhi: “अदाणी भ्रष्ट माणूस, मोदी या व्यक्तीला का वाचवत आहेत?”
rahul gandhi slams modi, say’s why narendra modi and bjp protect gautam Adani : खासदारकी रद्द झाल्यानंतर राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन नरेंद्र मोदी आणि भाजपवर प्रश्नांची सरबत्ती केली. अदाणी मुद्द्यावरून राहुल गांधींना मोदींना लक्ष्य केले.
ADVERTISEMENT
rahul gandhi say’s why narendra modi and bjp protect gautam Adani : सूरत सत्र न्यायालयाने शिक्षा दिल्यानंतर लोकसभा सचिवालयाने राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केली. त्यानंतर राहुल गांधी यांनी शनिवारी (25 मार्च) दिल्लीत पत्रकार परिषद घेत अदाणी मुद्द्यावरून नरेंद्र मोदी आणि भाजपवर शरसंधान केले. नरेंद्र मोदी घाबरले आहेत आणि त्यांनी लोकांचे लक्ष हटवण्यासाठी हे केले. मी मोदींबद्दल विचारत नाहीये, अदाणींबद्दल विचारतोय, मग भाजप त्यांचे संरक्षण का करत आहेत?, असा करत राहुल गांधींना पंतप्रधान मोदी आणि भाजपची कोंडी केली.
ADVERTISEMENT
दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत राहुल गांधी म्हणाले, “”भाजपचे सगळे नेते नरेंद्र मोदींना घाबरतात. नरेंद्र मोदींनी सांगितले की, लक्ष हटवायचे आहे. त्यांना (भाजप नेते) माहितीये नरेंद्र मोदी आणि अदाणींमधील नाते. सगळ्यांना माहिती आहे, पण ते घाबरतात. पण, प्रश्न एकच आहे 20 हजार कोटी रुपये कुणाचे आहेत?”
नरेंद्र मोदी हे या व्यक्तीला का वाचवत आहेत?, राहुल गांधी काय म्हणाले?
“नरेंद्र मोदी यांनी हे जे घाबरून जाऊन केले आहे, त्याचा जास्त फायदा विरोधकांना होणार आहे. त्यांनी आमच्या हातात अस्त्र दिले आहे. मोदीजी घाबरले आहेत की, सगळ बाहेर येईल, 20 हजार कोटी रुपये कुणाचे आहेत. घाबरून त्यांनी हे सुरू केले. जनतेच्या मनात एक प्रश्न आलाय की, अदाणी भ्रष्ट माणूस आहे. जनतेला असा प्रश्न पडला आहे की, या भ्रष्ट व्यक्तीला भारताचे पंतप्रधान का वाचवत आहेत? भाजपचे लोक, नरेंद्र मोदी हे या व्यक्तीला का वाचवत आहेत?”, असा प्रश्न राहुल गांधींनी उपस्थित केला.
हे वाचलं का?
वाचा – Rahul Gandhi Disqualified: सोनिया, इंदिरा गांधींनाही गमवावी लागली होती खासदारकी, काय घडलं होतं?
“भाजपचे लोक म्हणाले की, अदाणींवर आक्रमण हे देशावरील आक्रमण आहे. म्हणजे त्यांच्या डोक्यात देश म्हणजे अदाणी आणि अदाणी म्हणजे देश असंच आहे, ही गोष्ट समजून घ्या”, असं ते यावेळी म्हणाले.
वाचा – अदाणींच्या कंपन्यांतील 20 हजार कोटी कुणाचे? राहुल गांधींनी मोदींवर चढवला हल्ला
“भाजपकडून सातत्याने माफी मागा अशी मागणी केली जात आहे. त्यावर राहुल गांधी म्हणाले, “माझे नाव सावरकर नाही. माझे नाव गांधी आहे. गांधी कुणाची माफी मागत नाही. मी संसदेत म्हणालो की, मला बोलू द्या. एकदा तरी बोलू द्या. दोनदा चिठ्ठी लिहिली. लोकसभा अध्यक्षांना भेटलो. त्यांनी हसत सांगितले की, बोलू देऊ शकत नाही. मग मला मोदींना विचारावे लागले, ते तर बोलू देणार नाही’, असं म्हणत राहुल गांधींनी नरेंद्र मोदींवर टीकास्त्र डागलं.
ADVERTISEMENT
मी मोदींबद्दल नाही, अदाणींबद्दल विचारतोय -राहुल गांधी
“या देशातील लोकशाही संपली आहे. देशातील लोक त्यांच्या मनातील बोलू शकत नाही. देशातील यंत्रणांवर आक्रमण झाले आहे. त्या आक्रमणाची पद्धत म्हणजे नरेंद्र मोदी आणि अदाणींचे नाते आहे. मी नरेंद्र मोदींबद्दल प्रश्न विचारत नाहीये, मी अदाणींबद्दल प्रश्न विचारत आहे. भाजप अदाणींचे का संरक्षण करत आहे, तुम्ही नरेंद्र मोदींचे संरक्षण करा. तुम्ही (भाजप) अदाणींचे यामुळे संरक्षण करत आहात, कारण तुम्हीच अदाणी आहात”, असा प्रश्न राहुल गांधी यांनी यावेळी विचारला.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT