PI Pratap Darade यांच्या बदलीचे तीव्र पडसाद : आदेशाविरोधात लोकं रस्त्यावर
(Police inspector Pratap Darades transfer) अहमदनगर : राहुरीचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या बदली आदेशाविरोधात तीव्र पडसाद उमटले. राहुरीमधील नागरिकांनी दराडे यांच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरुन चक्काजाम आंदोलन केलं. नागरिकांच्या या आंदोलनात माजीमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्राजक्त तनपुरे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब खेवरे, रिपाइं (आठवले गट) पदाधिकारी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. […]
ADVERTISEMENT

(Police inspector Pratap Darades transfer)
अहमदनगर : राहुरीचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या बदली आदेशाविरोधात तीव्र पडसाद उमटले. राहुरीमधील नागरिकांनी दराडे यांच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरुन चक्काजाम आंदोलन केलं. नागरिकांच्या या आंदोलनात माजीमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्राजक्त तनपुरे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब खेवरे, रिपाइं (आठवले गट) पदाधिकारी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते.
नेमकं काय आहे प्रकरण?
अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील ब्राह्मणी गावातील धर्मांतर प्रकरणाचा योग्य पद्धतीनं तपास न केल्याचा ठपका पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्यावर ठेवण्यात आला आहे. भाजप आमदार राम सातपुते यांनी हा मुद्दा हिवाळी अधिवेशनात उपस्थित केला. यावर प्रभारी गृहमंत्री शंभूराज देसाई यांनी तत्काळ दराडे यांची येत्या पंधरा दिवसांत चौकशी करण्याचे आणि तोपर्यंत त्यांची नियंत्रण कक्षात बदली करण्याचे आदेश दिले.
सरकारच्या या आदेशांविरोधात राहुरीतील नागरिक रस्त्यावर उतरले. नागरिकांनी नगर-मनमाड रस्त्यावर ‘चक्काजाम’ आंदोनल केलं. नागरिकांच्या या आंदोलनाला महाविकास आघाडीच्या नेत्यांनीही पाठिंबा दिला. राष्ट्रवादीचे आमदार प्राजक्त तनपुरे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब खेवरे या आंदोलनात रस्त्यावर उतरले होते. ही बदली सुडबुद्धीनं केली असल्याचा आरोप विरोधकांनी केला.