यापूर्वीही केंद्रीय तपास यंत्रणांना सहकार्य केले, पुढेही करणार : रोहित पवार
बारामती : माध्यमांमधून काही बातम्या मी ऐकल्या. पण त्या कशा आल्या हे माहित नाही. मला खोलात जावून समजून घ्यावे लागले. पण जे लोक माझ्याशी बोलणार आहेत, त्यांचा निरोप आल्यानंतर काय खरं काय खोट हे मी नक्कीच सांगेन. सोबतच मी संचालक होतो हे कोणी सांगितले, त्यांच्याकडे नेमके काय कागदपत्र आहेत ते आधी काय आहेत ते पाहून […]
ADVERTISEMENT
बारामती : माध्यमांमधून काही बातम्या मी ऐकल्या. पण त्या कशा आल्या हे माहित नाही. मला खोलात जावून समजून घ्यावे लागले. पण जे लोक माझ्याशी बोलणार आहेत, त्यांचा निरोप आल्यानंतर काय खरं काय खोट हे मी नक्कीच सांगेन. सोबतच मी संचालक होतो हे कोणी सांगितले, त्यांच्याकडे नेमके काय कागदपत्र आहेत ते आधी काय आहेत ते पाहून मी या संदर्भात बोलेन. यापूर्वीही मी अनेकदा अशा केंद्रीय तपास यंत्रणांना चौकशांसाठी सहकार्य केले असून यापुढेही करेन, अशा शब्दात ग्रीन एकर कंपनीच्या ईडी चौकशी आदेशावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
ADVERTISEMENT
बारामतीमधील आप्पासाहेब पवार सभागृहातील सृजन भजन स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमानंतर आमदार रोहित पवार बोलत होते. माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक, अनिल देशमुख, शिवसेना नेते संजय राऊत यांच्यानंतर आता ईडीने आपला मोर्चा थेट पवार कुटुंबीयांकडे वळविला आहे. रोहित पवार संचालक राहिलेल्या ग्रीन एकर या कंपनीची प्राथामिक चौकशी करण्याचे आदेश ईडीकडून देण्यात आले आहे.
ईडीचा मोर्चा आमदार रोहित पवारांकडे : ग्रीन एकर कंपनीच्या चौकशीचे आदेश
हे वाचलं का?
नेमके काय आहे प्रकरण?
आमदार रोहित पवार हे ग्रीन एकर रिसॉर्ट्स अँड रिलेटर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत 2006 ते 2012 दरम्यान संचालक होते. रोहित पवार यांचे वडील राजेंद्र पवारही 2006 ते 2009 दरम्यान कंपनीचे संचालक होते. त्यावेळी कंपनीत येस बॅक घोटाळ्यातील आरोपी राकेश वाधवान आणि सारंग वाधवान यांच्याही सहभाग होता. मात्र, येस बँक घोटाळ्यात नाव आल्यावर त्यांनी या कंपनीच्या संचालक पदाचा राजीनामा दिला होता.
याशिवाय या कंपनीत संचालक असणारे इतर सदस्य हे सध्या वाधवान यांच्यासोबत इतर कंपन्यांमध्ये पार्टनर आहेत. यामध्ये बाबासाहेब सुर्यवंशी, लखमिंदर सिंग, धोंडू जडयार अरविंद पाटील यांच्या नावांचा सामावेश आहे. ज्यावेळी रोहित पवार ग्रीन एकर रिसॉर्ट्स अँड रिलेटर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीतून बाहेर पडले त्यावेळी हळूहळू इतर 4 सदस्य देखील त्या कंपनीतून बाहेर पडले.
ADVERTISEMENT
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दसरा मेळावा हायजॅक करणार का? देवेंद्र फडणवीस यांनी दिलं उत्तर, म्हणाले…
ADVERTISEMENT
याच सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ईडीने या प्रकरणात ग्रीन एकर कंपनीच्या प्राथमिक चौकशीचे आदेश दिले आहेत. ईडी आपल्या तपासात या कंपनीचा फॉरेन्सिक ऑडिट, शेअर धारक आणि संचालक यांची अर्थिक देवाण घेवाण याचा बारकाईने तपास करण्याची शक्यता आहे. दरम्यान, ईडीला या कंपनीत अनेक गैरव्यवहार झाले असल्याची तक्रार प्राप्त झाली असल्याची माहिती आहे. कंपनीत जवळपास 10 कोटी रुपयांचा बेहिशेबी व्यवहार झाला असल्याचा आरोपही करण्यात येत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस – भाजप आमनेसामने :
या मुद्द्यावर बोलताना अत्यंत प्रामाणिक लोकांच्या चौकशा लावणे आणि गुन्हेगारांना मंत्रिपद देणे हे मोदी सरकारचे काम आहे. जो तुमच्या भाजपमध्ये येत नाही त्याची ईडीची चौकशी लावायची, जेलमध्ये टाकायचे आणि जे गुन्हेगार आहेत त्यांना बाहेर सोडायचे हे भाजपचे शडयंत्र आहे. त्यासाठी ईडी, सीबीआय कार्यरत झाल्या आहेत, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष विद्या चव्हाण यांनी दिली आहे.
तर भारतीय घटनेप्रमाणे या काम करत आहेत. या सर्व घटनात्मक संस्था आहे. घटनेच्या अंतर्गत असणाऱ्या या स्वायत्त संस्थांवर मी बोलणे योग्य नाही अशी प्रतिक्रिया राज्याचे मंत्री आणि भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT