चंद्रकांत पाटील सुप्रिया सुळेंना म्हणाले, ‘घरी जा स्वयंपाक करा’, सदानंद सुळे संतापले

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई: भाजपने काल (25 मे) ओबीसीच्या राजकीय आरक्षणासाठी मोर्चा आयोजित केला होता. त्याचवेळी चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याशी संबंधित एक वक्तव्य केलं होतं. ज्यावर सुप्रिया सुळे यांचे पती सदानंद सुळे हे प्रचंड संतापले असून त्यांनी याबाबत सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन चंद्रकांत पाटील यांना सुनावलं आहे. आता सदानंद सुळे यांच्याशिवाय चंद्रकांत पाटील यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते टीका करत आहेत.

ADVERTISEMENT

चंद्रकांत पाटलांच्या ‘त्या’ वक्तव्यानंतर सदानंद सुळे संतापले!

‘हे आहेत महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि जे सुप्रिया सुळेंबद्दल बोलत आहेत. मला नेहमीच वाटतं की, हे स्त्री द्वेषी आहेत जिथे शक्य होईल तिथे महिलांचा अपमान करतात. पण मला माझ्या पत्नीचा अभिमान आहे. ती गृहिणी आहे, ती आई आहे आणि यशस्वी राजकारणी देखील आहे. देशातील इतर मेहनती आणि गुणवान महिलांप्रमाणे चंद्रकांत पाटलांनी सर्वच महिलांचा अपमान केला आहे.’ अशा शब्दात सदानंद सुळेंनी चंद्रकांत पाटील यांना सुनावलं आहे.

हे वाचलं का?

चंद्रकांत पाटलांचं नेमकं वक्तव्य काय?

‘अरे कशासाठी राजकारणामध्ये राहता.. घरी जावा.. घरी जावा… स्वयंपाक करा. खासदार आहात ना तुम्ही, कळत नाही एका मुख्यमंत्र्यांची भेट कशी घ्यायची. कळत नाही एक शिष्टमंडळ पाठवण्याचं. आता घरी जाण्याची वेळ झाली आहे. चला.. तुम्ही दिल्लीत जा.. नाहीतर मसणात जा.. शोध घ्या आणि आरक्षण द्या.’ असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे.

ADVERTISEMENT

Supriya Sule: ‘पंतप्रधान मोदींनी आमचं मन दुखावलं’, पाहा सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या

ADVERTISEMENT

सुप्रिया सुळेंच्या ‘या’ आरोपांमुळे चंद्रकांत पाटील म्हणाले..

‘मध्यप्रदेश सरकार आणि आपण काही तरी कॉमन करावं असा एक जेव्हा निर्णय झाला त्या निर्णयामध्ये असं ठरलं की, मध्यप्रदेश आणि आपण एकत्र लढणार आहोत. आता ही पण माझी काल्पनिक स्टोरी नाही. मध्यप्रदेश हे मी टेलिव्हिजनवर पाहिलेलं आहे आणि वर्तमानपत्रात वाचलेलं आहे. की, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री हे दिल्लीला गेले कोणा-कोणाला भेटले..’

‘मला कुणाचा अवमान करायचा नाही. पण दोन दिवसात असं काय मध्यप्रदेशच्या सरकारने केलं आणि दिल्लीत कोणाची मीटिंग झाली की, त्यांना देण्याचा.. परत एक फसवाफसवी झाली आणि आपल्यावर अन्याय झाला याचं उत्तर मी केंद्र सरकारला मी नक्की विचारणार आहे.’

‘दुसरा मुद्दा.. मध्यप्रदेशची जी ऑर्डर आहे ती तुम्ही वाचून पाहिली असेल तर ती फायनल ऑर्डर नाहीए. त्यामुळे हे जे सांगतायेत की, मध्यप्रदेशला जे जमलंय आणि तुम्हाला जमलं नाही याच्यातही राजकारण आहे.’ असा आरोप सुप्रिया सुळेंनी केला होता. ज्यावर बोलताना चंद्रकांत पाटील यांनी सुप्रिया सुळे यांना घरी जा आणि स्वयंपाक करा असं म्हटलं होतं.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT