ठाण्यातील शिवसेनेचे फायरब्रँड नेते अनंत तरे यांचे निधन

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

ठाणे: ठाणे शहराचे माजी महापौर, माजी आमदार आणि कोळी समाजाचे नेते अनंत तरे यांचं आज (22 फेब्रुवारी) निधन झालं आहे. मागील दोन महिन्यापासून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. परंतु आज पावणे पाच वाजेच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा, दोन नातवंडे भाऊ असा परिवार आहे. निधनसमयी त्यांचं वय 67 होतं. दरम्यान, उद्या (मंगळवारी) दुपारी दोन वाजेच्या सुमारास त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

अनंत तरे यांचं ब्रेन हॅमरेज झाल्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून त्यांच्यावर ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली. ठाण्यातील शिवसेनेच्या दिग्गज नेत्यांपैकी अनंत तरे हे एक होते. ठाण्यातील कोळी समाजातून त्यांचं नेतृत्व उदयाला आलं होतं. ठाण्यात शिवसेना वाढीसाठी त्यांनी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले होते. याशिवाय सक्रीय राजकारणात असताना त्यांनी ठाणे महापालिकेचं महापौर पद देखील भूषवलं होतं. दरम्यान, त्यांच्या निधनामुळे ठाण्यात शिवसेनेला मात्र मोठा धक्का बसला आहे.

ही बातमी पाहा: मुंबईतील हॉटेलात खासदाराचा मृतदेह सापडला, आत्महत्या केल्याचा अंदाज

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

अनंत तरे यांची राजकीय कारकीर्द

1992 साली ठाणे महापालिका निवडणुकीत ते पहिल्यांदा नगरसेवक म्हणून निवडून गेले होते. दरम्यान, वर्षभरातच त्यांना ठाणे महापालिकेचं महापौर पद देखील मिळालं. त्यानंतर 1994 आणि 1995 असं सलग तीन वर्ष त्यांनी महापौर पद भूषवलं होतं. दरम्यान, 1998 आणि 1999 मध्ये त्यांनी रायगड जिल्ह्यातून लोकसभेची उमेदवारी देखील देण्यात आली होती. 2000 साली त्यांची विधानपरिषदेवर देखील निवड करण्यात आली होती. त्यानंतर मात्र ठाण्याचा राजकारणातून ते काहीसे बाजूला पडले. ठाण्यात एकनाथ शिंदे यांचा दबदबा सुरु झाल्यानंतर अनंत तरे यांचं महत्त्व काहीसं कमी झालं होतं. 2014 साली विधानसभा निवडणुकीत रवींद्र फाटक यांना उमेदवारी देण्यात आल्याने अनंत तरे यांनी बंडाचं निशाण फडकावलं होतं. पण त्यानंतर थेट मातोश्रीवर बोलावून उद्धव ठाकरे यांनी त्यांची नाराजी दूर केली होती. अनंत तरे हे प्रसिद्ध एकविरा देवी ट्रस्टचेही अध्यक्ष देखील होते.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT