Tarun Tejpal News: ‘तेहलका’चे माजी संपादक तरुण तेजपाल यांची लैंगिक शोषण प्रकरणी निर्दोष सुटका

मुंबई तक

पणजी: तेहलका मासिकाचे माजी संपादक तरुण तेजपाल यांच्यावर लावण्यात आलेल्या लैंगिक अत्याचार आणि बलात्काराच्या सर्व आरोपावरून निर्दोष मुक्तता झाली आहे. तरुण तेजपाल यांच्या महिला सहकाऱ्याने त्यांच्याविरोधात हे सर्व आरोप लावले होते. या प्रकरणी तब्बल 8 वर्षांपासून कोर्टात सुनावणी सुरु होती. अखेर आज (21 मे) गोव्याच्या म्हापुसा सत्र न्यायालयाने निर्णय देत तरुण तेजपाल हे निर्दोष असल्याचं […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

पणजी: तेहलका मासिकाचे माजी संपादक तरुण तेजपाल यांच्यावर लावण्यात आलेल्या लैंगिक अत्याचार आणि बलात्काराच्या सर्व आरोपावरून निर्दोष मुक्तता झाली आहे. तरुण तेजपाल यांच्या महिला सहकाऱ्याने त्यांच्याविरोधात हे सर्व आरोप लावले होते. या प्रकरणी तब्बल 8 वर्षांपासून कोर्टात सुनावणी सुरु होती. अखेर आज (21 मे) गोव्याच्या म्हापुसा सत्र न्यायालयाने निर्णय देत तरुण तेजपाल हे निर्दोष असल्याचं म्हटलं आहे. कोर्टाचा हा निकाल तरुण तेजपाल यांच्यासाठी मोठा दिलासा ठरला आहे.

तरुण तेजपाल यांनी आपल्यासोबत लिफ्टमध्ये लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप त्यांच्या एका कनिष्ठ महिला सहकाऱ्याने केला होता. ज्यामुळे तरुण तेजपाल यांना अटकही करण्यात आली होती. दरम्यान, मे 2014 पासून ते जामिनावर सुटले होते.

बलात्काराचा आरोपी टॅटूमुळे का सुटला ?

संपादक तरुण तेजपाल यांच्यावर लैंगिक छळ आणि बलात्काराचे आरोप करण्यात आल्यानंतर त्यांच्याविरोधात गोवा पोलिसात नोव्हेंबर 2013 साली गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर तरुण तेजपाल यांना अटकही करण्यात आली होती. गोवा पोलिसांनी त्यांच्याविरोधात फेब्रुवारी 2014 मध्ये तब्बल 2486 पानांची चार्जशीट दाखल केली होती. दरम्यान, याप्रकरणी कोर्टाकडून मे 2014 मध्ये त्यांना कोर्टाकडून जामीन मंजूर झाला होता.

हे वाचलं का?

    follow whatsapp