गणेश नाईकांच्या अडचणी वाढणार? कोर्टाने अटकपूर्व जामीन फेटाळला
भाजप आमदार गणेश नाईक यांच्या अडणची वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एका महिलेने केलेल्या गंभीर आरोपांप्रकरणी गणेश नाईकांनी अटकपूर्व जामीनासाठी ठाणे सत्र न्यायालयात धाव घेतली होती. आज झालेल्या सुनावणी सत्र न्यायालयाने गणेश नाईक यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला आहे. त्यामुळे या प्रकरणात आता गणेश नाईकांना कधीही अटक होण्याची शक्यता आहे. काय आहे हे नेमकं प्रकरण? भाजप […]
ADVERTISEMENT
भाजप आमदार गणेश नाईक यांच्या अडणची वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एका महिलेने केलेल्या गंभीर आरोपांप्रकरणी गणेश नाईकांनी अटकपूर्व जामीनासाठी ठाणे सत्र न्यायालयात धाव घेतली होती. आज झालेल्या सुनावणी सत्र न्यायालयाने गणेश नाईक यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला आहे. त्यामुळे या प्रकरणात आता गणेश नाईकांना कधीही अटक होण्याची शक्यता आहे.
ADVERTISEMENT
काय आहे हे नेमकं प्रकरण?
भाजप आमदार गणेश नाईक यांच्यावर एका महिलेनं लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत असल्याचा आरोप करत गणेश नाईकांपासून आपल्याला मुलगा असून त्याला वडीलांचं नाव मिळावं अशी मागणी केली होती. या प्रकरणामुळे नवी मुंबईत खळबळ उडाली होती. पीडित महिलेने आमची डीएनए चाचणी करावी, कुठल्याही राजकीय पक्षाचा दबाव नाही असं सांगितलं होतं.
हे वाचलं का?
राणा दाम्पत्याच्या जामिनाचा फैसला सोमवारी, आणखी दोन दिवस मुक्काम तुरुंगातच
आमच्यावर सुरुवातीपासून भेदभाव होत आलाय, कुठेही आमचा स्वीकार केला गेला नाही. इतकी वर्ष आम्हाला लपवून ठेवलं गेलं. नाईकांना माझ्या मुलाविषयी कोणतीही प्रेमाची भावना नाही, अशी प्रतिक्रिया पीडित महिलेने दिली होती. यासोबतच मला पैश्याचा मोह नसून फक्त मुलाला वडिलांचे नाव मिळावं हीच अपेक्षा असल्याचे या महिलेनं स्पष्ट केलं होतं.
ADVERTISEMENT
हे प्रकरण चर्चेत असताना, पीडित महिलेने बेलापूर पोलीस ठाण्यात शस्त्र दाखवून धमकावणे तर नेरुळ पोलीस ठाण्यात बलात्काराची तक्रार दाखल केली होती. या दोन्ही प्रकरणांमध्ये कोर्टाने नाईकांचा अटकपूर्व जामीन फेटाळला आहे. गणेश नाईकांसारखी प्रतिष्ठीत व्यक्ती या प्रकरणात दबाव आणू शकते असा युक्तीवाद पीडित महिलेच्या वकीलांनी आणि पोलिसांनी केला होता. त्यामुळे या प्रकरणात आता पुढे नेमक्या काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
ADVERTISEMENT
“योगी होण्यासाठी देवेंद्र फडणवीस बायकोला सोडणार का?” दीपाली सय्यद यांचा सवाल
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT