Sanjay Raut : महाराष्ट्रात अद्याप सरकार अस्तित्वात नाही

मुंबई तक

योगेश पांडे, प्रतिनिधी, नागपूर महाराष्ट्रात अद्याप सरकार अस्तित्वात नाही. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या दोघांनीच शपथ घेतली आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार का केला जात नाही? मंत्रिमंडळाचा शपथविधी कधी होणार हा प्रश्न आहे. असं म्हणत संजय राऊत यांनी शिंदे फडणवीस सरकारवर टीका केली आहे. नागपूरमध्ये ते शिवसैनिकांची भेट घेणार आहेत. त्यामुळे विमानतळावर येताच त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
google news

योगेश पांडे, प्रतिनिधी, नागपूर

महाराष्ट्रात अद्याप सरकार अस्तित्वात नाही. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या दोघांनीच शपथ घेतली आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार का केला जात नाही? मंत्रिमंडळाचा शपथविधी कधी होणार हा प्रश्न आहे. असं म्हणत संजय राऊत यांनी शिंदे फडणवीस सरकारवर टीका केली आहे. नागपूरमध्ये ते शिवसैनिकांची भेट घेणार आहेत. त्यामुळे विमानतळावर येताच त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांना बंडाबाबत विचारलं असता, आता बंड विसरून जा. असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. तसंच बंड केलेल्या आमदारांना आम्ही विचारत नाही असंच त्यांनी एक प्रकारे दाखवून दिलं आहे. एवढंच नाही तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही त्यांनी टोला लगावला आहे.

काय म्हणाले आहेत संजय राऊत?

हे वाचलं का?