Personal Finance: 'ही' कागदपत्रं असतील तरच खरेदी करा सेकंड हँड गाडी, नाहीतर...

रोहित गोळे

Car Purchase: सेकंड हँड गाडी खरेदी करताना केवळ वाहनाची किंमत किंवा बाह्य स्वरूप पाहणे पुरेसे नसते. त्याआधी काही कागदपत्रं तपासणं गरजेचं असतं. जर संबंधित कागदपत्रं उपलब्ध नसतील तर गाडी अजिबात खरेदी करू नका.

ADVERTISEMENT

personal finance do not buy a second hand car at all if these 10 important documents are missing
Personal Finance (प्रातिनिधिक फोटो)
google news

Personal Finance tips for Car Purchase: आजकाल नवीन वाहनांच्या वाढत्या किंमतींमुळे अनेकजण सेकंड हँड किंवा वापरलेली गाडी खरेदी करण्याला प्राधान्य देतात. मात्र, कमी किंमतीच्या मोहात पडून आवश्यक कागदपत्रांची पडताळणी न केल्यास मोठ्या आर्थिक आणि कायदेशीर अडचणींना सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे सेकंड हँड गाडी खरेदी करण्यापूर्वी कोणती कागदपत्रे तपासावीत, याची माहिती असणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

1. आरसी बुक (Registration Certificate - RC)

गाडीचे सर्वात महत्त्वाचे कागदपत्र म्हणजे आरसी बुक. यामध्ये वाहन मालकाचे नाव, इंजिन क्रमांक, चेसिस क्रमांक, वाहनाचा प्रकार आणि नोंदणीची माहिती असते.

काय तपासाल?

  • आरसीवरील मालकाचे नाव आणि विक्रेत्याचे नाव जुळते का?
  • इंजिन आणि चेसिस नंबर प्रत्यक्ष वाहनाशी जुळतात का?
  • वाहनावर कर्ज (Hypothecation) आहे का?

2. वाहन विमा (Insurance Policy)

गाडीचा विमा वैध आहे का हे तपासणे आवश्यक आहे.

हे वाचलं का?