मंगळवेढा: दुकानातून आणलेल्या खाऊमुळे दोन सख्ख्या बहिणींनी गमावला जीव

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

नितीन शिंदे, मंगळवेढा: मंगळवेढा तालुक्यातील मरवडे येथे अन्नातून झालेल्या विषबाधेमुळे दोन सख्ख्या बहिणीचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. भक्ती आबासाहेब चव्हाण ( वय 6 वर्ष) आणि नम्रता आबासाहेब चव्हाण ( वय 4 वर्ष) या दोन चिमुकल्या मुलींचा मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

ADVERTISEMENT

मरवडे येथील आबासाहेब चव्हाण यांनी आपल्या भक्ती व नम्रता या लहान मुलींसाठी मंगळवारी मंगळवेढा येथील एका दुकानातून खाऊ आणला होता. हा खाऊ खाल्यानंतर चव्हाण कुटुंबातील सर्वांनाच अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे ते सर्व जण मंगळवेढा व पंढरपूर येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले.

उपचारादरम्यान गुरुवारी पहाटे आबासाहेब चव्हाण यांची मोठी मुलगी भक्ती हिचा मृत्यू झाला तर दुसरी मुलगी नम्रता हिचा मृत्यू गुरुवारी मध्यरात्री उपचारादरम्यान झाला. मयत मुलीचे वडील आबासाहेब व आई सुषमा यांच्यावर देखील अद्याप उपचार सुरु आहेत.

हे वाचलं का?

एकाच कुटुंबातील दोघी बहिणींचा अन्नातील विषबाधेने मृत्यू झाल्याने मरवडेत खळबळ उडाली असून, या घटनेबद्दल शोक व्यक्त केला जात आहे.

याप्रकरणी आता मंगळवेढा पोलिसात गुन्हा देखील दाखल झाला आहे. मृत मुलींच्या वडिलांनी नेमकं कोणत्या दुकानातून खाऊ आणला होता. मुलींच्या शरीरात काही विषारी द्रव्य सापडले आहेत का या सगळ्याच तपास केला जाणं गरजेचं आहे.

ADVERTISEMENT

मुलींच्या आई-वडिलांवर उपचार सुरु असल्याने अद्याप तरी या प्रकरणी संपूर्ण माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे मुलींचे आई-वडील यांची प्रकृती चांगली झाल्यानंतरच पोलीस त्यांचा जबाब नोंदवलीत.

ADVERTISEMENT

बीड : भरधाव स्कॉर्पिओच्या वेगात दोन सख्ख्या बहिणींचा मृत्यू

दरम्यान, याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर मंगळवेढा पोलीस आता याचा सखोल तपास करत आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT