फडणवीस कंस मामा?; अंधेरीची पोटनिवडणूक जिंकल्यानंतर ठाकरेंनी डिवचलं, शिंदेंवरही डागले बाण
अंधेरी पूर्व पोटनिवडणूक पार पडली. शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ऋतुजा लटके मोठ्या मताधिक्यानं विजयी झाल्या. अंधेरी पोटनिवडणूक विजय मिळवल्यानंतर उद्धव ठाकरेंनी सामना अग्रलेखातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना यांच्यावर निशाणा साधलाय. अंधेरीच्या पोटनिवडणुकीवर सामना अग्रलेखात काय म्हटलंय? उद्धव ठाकरे संपादक असलेल्या सामनात म्हटलंय, “पोटनिवडणुकीच्या आधी मिंधे गट शिवसेनेतून बाहेर पडला. […]
ADVERTISEMENT

अंधेरी पूर्व पोटनिवडणूक पार पडली. शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ऋतुजा लटके मोठ्या मताधिक्यानं विजयी झाल्या. अंधेरी पोटनिवडणूक विजय मिळवल्यानंतर उद्धव ठाकरेंनी सामना अग्रलेखातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना यांच्यावर निशाणा साधलाय.
अंधेरीच्या पोटनिवडणुकीवर सामना अग्रलेखात काय म्हटलंय?
उद्धव ठाकरे संपादक असलेल्या सामनात म्हटलंय, “पोटनिवडणुकीच्या आधी मिंधे गट शिवसेनेतून बाहेर पडला. भाजपबरोबर सरकार स्थापन करून त्यांनी शिवसेना हे नाव व धनुष्यबाण चिन्ह गोठवून घेतले. म्हणजे भाजपने मिंधे गटाच्या खांद्यावर बंदूक ठेवून हा निशाणा साधला. धनुष्यबाण गोठवून भाजप व त्यांच्या मिंध्यांना विकृत आनंद मिळाला तरी मुंबईची जनता मात्र शिवसेनेच्या पाठीत झालेले घाव पाहून खवळून उठली.”
“महाराष्ट्राची परंपरा, संस्कृती, माणुसकी अशा शब्दांच्या टिचक्या मारून भाजपने माघार घेतली होती ती फक्त मुंबईत पहिल्याच निवडणुकीत बेअब्रू होऊ नये म्हणून. मुळात अंधेरी पोटनिवडणूक आपणास लढायची आहे, असा वाद निर्माण करून भाजपपुरस्कृत मिंधे गटाने धनुष्यबाणावर दावा लावला व निवडणूक आयोगाने परंपरा, इतिहास, खरे-खोटेपणाचे भान न ठेवता शिवसेना हे नाव व धनुष्यबाणच गोठवले. ही गोठवागोठवी करून भाजप व त्यांच्या मिंध्यांनी निवडणुकीच्या मैदानातून पळ काढला.”
Andheri bypoll election results : ऋतुजा लटके अंधेरीच्या आमदार, ‘नोटा’ने अपक्षांवर केली मात