SambhajiRaje: आम्ही अपक्षाला पाठिंबा देणार नाही, मग ते.. ही उद्धवजींच्या ‘मन की बात’: राऊत
मुंबई: ‘आम्ही अपक्षाला पाठिंबा देणार नाही. मग ते कोणीही असो. ये मेरे ‘मन की बात’ नही है.. ये उद्धवजी के मन की बात है.’ अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते संजय राऊत यांनी माध्यमांना दिली आहे. राज्यसभा निवडणुकीसाठी संभाजीराजे जर शिवसेनेत प्रवेश करणार असतील तरच त्यांना शिवसेनेची मतं मिळतील अपक्षाला शिवसेना मतदान करणार नाही. अशी रोखठोक भूमिका […]
ADVERTISEMENT

मुंबई: ‘आम्ही अपक्षाला पाठिंबा देणार नाही. मग ते कोणीही असो. ये मेरे ‘मन की बात’ नही है.. ये उद्धवजी के मन की बात है.’ अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते संजय राऊत यांनी माध्यमांना दिली आहे. राज्यसभा निवडणुकीसाठी संभाजीराजे जर शिवसेनेत प्रवेश करणार असतील तरच त्यांना शिवसेनेची मतं मिळतील अपक्षाला शिवसेना मतदान करणार नाही. अशी रोखठोक भूमिका आता शिवसेनेने घेतली आहे.
संभाजीराजे यांनी शिवसेनेत यावं यासाठी त्यांच्यासोबत शिवसेनेच्या नेत्यांची बैठकही पार पडली होती. मात्र, असं असलं तरीही अद्याप संभाजीराजे हे शिवसेनेत येण्यासाठी तयार नसल्याचं समजतं आहे. अशा वेळी शिवसेना देखील आपल्या मतावर ठाम आहे.
संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
‘मला काही माहित नाही.. संभाजीराजेंनी प्रस्ताव स्वीकारला की नाही. नंबर एक म्हणजे हा काही प्रस्ताव नव्हता. शिवसेना दोन जागा लढवणार आहे. शिवसेनेनं दोन जागा लढवणं हा काही राजकीय अपराध नाही. शिवसेना हा एक राजकीय पक्ष आहे. शिवसेना हे मराठी माणूस आणि हिंदुत्वाचं फार मोठं संघटन आहे. महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री आहे. अशा वेळेला राज्यसभेच्या ज्या निवडणुका होत आहेत त्यातील दोन जागा या शिवसेना लढते आहे.’