शरद पवारांच्या ‘त्या’ विधानाचा अर्थ काय… 2024 मध्ये सत्तांतर होईल?
Sharad Pawar: बारामती: देशात सध्या बदलाचं वातावरण आणि विविध राज्यांमध्ये ते पाहायला मिळत आहे. असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी केलं आहे. मात्र, असं असलं तरीही देशातील सत्ता भाजप (BJP) गमावू शकतं का? याच आपण या लेखातून उहापोह करूयात. (what is meaning of sharad pawars statement do you think power […]
ADVERTISEMENT
Sharad Pawar: बारामती: देशात सध्या बदलाचं वातावरण आणि विविध राज्यांमध्ये ते पाहायला मिळत आहे. असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी केलं आहे. मात्र, असं असलं तरीही देशातील सत्ता भाजप (BJP) गमावू शकतं का? याच आपण या लेखातून उहापोह करूयात. (what is meaning of sharad pawars statement do you think power of the country will change in 2024)
ADVERTISEMENT
सगळ्यात आधी आपण जाणून घेऊयात शरद पवार नेमकं काय म्हणाले:
‘देशात सध्या बदलाचे वातावरण तयार होताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच झालेल्या पदवीधर निवडणुका ज्यामध्ये भाजपला एखादी जागा सोडली तर जवळपास सगळीकडे महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आले. पुण्याच्या निवडणुकीबाबत मी काही सांगण्याची गरज नाही ते जगजाहीर आहे. त्यामुळे आता निष्कर्ष काढणे योग्य नाही. मला जी माहिती मिळाली आहे त्याच्यामध्ये देशाचे चित्र बदलत आहे.’
‘कसबा पोटनिवडणुकीमधील मी माहिती घेतली त्याच्यामध्ये दोन ठिकाणी अधिक मते मिळाली आहेत. हा बदल आहे तो पुण्यात होत आहे. याचा अर्थ लोक वेगळ्या विचाराच्या प्रक्रियेत आहेत.’ असं शरद पवार यावेळी म्हणाले.
हे वाचलं का?
देशात 2024 मध्ये राजकीय बदल होऊ शकतो का?
खरं आतापर्यंत देशाने प्रचंड बहुमत असलेली सरकारं घालवली आहेत. त्यामुळे भारतासारख्या खंडप्राय देशात कोणा एका पक्षाची सत्ता अबाधित राहील असं छातीठोकपणे म्हणता येणार नाही. मात्र, असं असलं तरी देशील विद्यामान मोदी सरकारला अगदीच 2024 मध्ये सत्ता गमवावी लागेल असं आज घडीला तरी म्हणता येणार नाही.
Nagaland मध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने चमत्कार कसा केला? वाचा Inside Story
ADVERTISEMENT
खरं तर देशातील मोदी सरकार हे पाहायला गेलं तर एकखांबी सरकार आहे. कारण पंतप्रधान मोदींच्या चेहऱ्याशिवाय दुसरा कोणताही चेहरा आजघडीला भाजपकडे नाही किंवा त्या तोडीचा दुसरा नेता जो देशातील नागरिकांवर तेवढ्या ठामपणे आपली छाप पाडेल.
ADVERTISEMENT
त्यामुळे 2024 च्या निवडणुका या पुन्हा एकदा मोदींच्याच नेतृत्वात लढवल्या जाणार हे स्पष्ट आहे. तसंच लोकसभेच्या जागांचं गणितही आपण जर लक्षात घेतलं तर सध्याच्या घडीला बहुमतापेक्षाही 30 जागा या भाजपकडे अधिक आहेत.
शरद पवार संजय राऊतांच्या पाठिशी! सत्ताधाऱ्यांना दिला इतिहासाचा दाखला
त्यामुळे भाजपच्या एवढ्या जागा कमी करण्यासाठी विरोधकांना एक जबरदस्त मोट बांधावी लागणार आहेत. देशातील प्रमुख पक्ष असलेल्या काँग्रेसला तर यासाठी अथक परिश्रम घ्यावे लागतील. कारण काँग्रेस पक्षा मागील दोन निवडणुकांमध्ये तीन आकडी संख्याच गाठू शकलेली नाही.
जर आपण शरद पवार यांच्या वक्तव्याचा जरी विचार केला तरीही देशात 2019 च्या निवडणुकीआधीही अनेक ठिकाणी अशाच प्रकारे पोटनिवडणुकांमध्ये भाजपचा दारुण पराभव झाला होता. मात्र, 2019 लोकसभा निवडणुकीत भाजपने 303 जागा जिंकून आपलाच विक्रम मोडीत काढला. यामुळे सांख्यिकीदृष्ट्या आपण गोष्टी लक्षात घेतल्या तर भाजपला पराभूत करण्यासाठी विरोधकांना मोठ्या प्रमाणात सध्याच्या सरकारविरोधात जनमत तयार करावं लागेल. तरच भाजपला थेट सत्तेतून खाली खेचता येईल.
शरद पवारांनी सांगितलं ठाकरेंच्या शिवसेनेचं भवितव्य
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT