दुर्घटनेत जायबंदी झाला पत्नीचा हात, पतीने सव्वा लाखाची सुपारी देऊन बायकोला संपवलं

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

दीपिका शर्मा या महिलेची हत्या 15 नोव्हेंबरला झाली होती. या प्रकरणाचं गूढ पोलिसांनी 36 तासात सोडवलं आहे. हत्येचा कट रचल्याप्रकरणी या महिलेच्या पतीसहीत पाच जणांना अटक करण्यात आली आहे. एका दुर्घटनेत दीपिका शर्माचा हात जायबंदी झाला होता. त्या हाताने तिला काम करता येत नव्हतं. त्यामुळे तिच्या पतीने म्हणजेच रवि कुमारने सव्वा लाखाची सुपारी देऊन तिची हत्या घडवली.

ADVERTISEMENT

बिहारमधल्या मुंगेरमध्ये ही घटना घडली आहे. दीपिका शर्माचा पती CISF मध्ये कार्यरत आहे. कासिम बाजार पोलीस ठाणे परिसरात झालेल्या या हत्येप्रकरणी पोलीस अधीक्षक जगुनाथरेड्डी जलारेड्डी यांनी माहिती दिली की सोमवारी सकाळी दीपिकाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्यानंतर दीपिकाच्या भावाने म्हणजेच कुमार भानूने या संदर्भात तक्रार नोंदवली होती. ज्यानंतर केस दाखल करण्यात आली.

या प्रकरणी एसडीपीओच्या नेतृत्वात एक टीम तयार करण्यात आली. त्या टीमने जो शोध घेतला तेव्हा कुटुंबीयांचं कॉल रेकॉर्ड काढण्यास सुरूवात केली. पोलिसांनी दीपिकाचा दीर छोटू शर्मा, सासरे राजीव कुमार, आते देवर सुमित कुमार यांचे कॉल रेकॉर्ड तपासले. त्यानंतर पोलिसांना हे समजलं की छोटी आणि सुमित हे हत्येच्या दिवशी घरीच होते. शामपूरमधला एक शूटर गौतम कुमार, संजीव कुमार आणि पतलू यांच्यात फोनवर चर्चा झाली होती. पोलिसांना हे डिटेल्स मिळताच पोलिसांनी तिघांच्या घरी छापेमारी केली. गौतम आणि संजीवला अटक करण्यात आली. पतलू फरार झाला.

हे वाचलं का?

गौतम कुमारची कसून चौकशी केल्यानंतर आपण हत्याकांडात सहभागी होतो असं त्याने सांगितलं. त्याने सांगितलं की सुमित कुमारने फोन करतून एक महिना आधी सांगितलं की होतं की माझा भाऊ रवि कुमार याला त्याच्या पत्नीची हत्या करायची आहे. हा सौदा 1 लाख 20 हजारात झाला आहे. सुमितने त्याच्या मोबाईलवरून गौतम आणि रवि कुमार यांची चर्चा घडवली आणि अॅडव्हान्स म्हणून गौतमला रविने 20 हजार रुपये दिले.

मुंगेरचे एसएसपी जलारेड्डी यांनी सांगितलं की 2017 मध्येही दीपिकावर ती तिच्या माहेरी गेली असताना गोळीबार झाला होता. त्यावेळी ती सात महिन्यांची गरोदर होती. त्या घटनेत दीपिकाच्या आईचा मृत्यू झाला. दीपिकाला दोन गोळ्या लागल्या होत्या ज्यातली एक तिच्या डाव्या हाताला लागली होती त्यामुळे तो हात जायबंदी झाला होता. तिचा एक हात जायबंदी झाल्याने तिच्या पतीसहीत तिच्या सासरचे लोक तिचा तिरस्कार करू लागले होते. जलारेड्डी यांनी हेदेखील सांगितलं की तिचा नाराज पती आणि सासरचे लोक यांनीच तिची हत्या करण्याचं ठरवलं होतं. सोमवारी दीपिका बाथरुममध्ये चालली होती तेव्हा भिंत ओलांडून शूटर्स आले आणि त्यांनी गोळ्या झाडून तिला ठार केलं. या प्रकरणी तिच्या पतीसहीत पाच जणांना अटक करण्यात आली आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT