Rana vs Shiv Sena: मोठी बातमी… ‘मातोश्री’वर जाणार नाही!, नवनीत-रवी राणांनी ‘हट्ट’ सोडला

मुंबई तक

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
social share
google news

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं खासगी निवासस्थान असलेल्या ‘मातोश्री’वर जाऊन आपण हनुमान चालीसा म्हणणार यावर ठाम असलेल्या राणा दाम्पत्याने आता मात्र माघार घेतली आहे. आपण ‘मातोश्री’वर जाणार नाही असं त्यांनी ANI वृत्तसंस्थेला सांगितलं.

ADVERTISEMENT

सुरुवातीला राणा दाम्पत्य हे दुपारी 3 वाजता पत्रकार परिषद घेणार असं कळविण्यात आलं होतं. मात्र, असं असताना त्याआधीच फक्त ANI वृत्तसंस्थेच्या पत्रकाराला बोलावून राणा दाम्पत्याने आपलं आंदोलन आपण उद्या होणाऱ्या पंतप्रधानांच्या दौऱ्यासाठी मागे घेत आहोत. असं जाहीर केलं.

पाहा रवी राणा नेमकं काय म्हणाले:

हे वाचलं का?

‘हनुमान जयंतीच्या शुभपर्वावर मी हात जोडून विनंती केली होती की, राज्याच्या मुख्यमंत्र्यांना की त्यांनी मातोश्रीवर हनुमान चालीसाचं पठण करावं. आपण मुख्यमंत्री झाल्यापासून महाराष्ट्रावर मोठ्या प्रमाणात संकटं आली आहेत. तेव्हापासून महाराष्ट्राची जनता त्रस्त आहे. यासाठी त्यांनी पठण करावं हे मी सांगितलं होतं.’

‘मातोश्री आणि बाळासाहेब ठाकरे हे आमच्या हृदयात आहेत. मी कुठेही चुकीचं भाष्य केलेलं नाही. पण मातोश्रीवर हनुमान चालीसा न वाचणं, आम्हाला विरोध करणं. आज जेव्हा शनिदेवाचा दिवस आहे त्यामुळे आम्ही मातोश्रीवर हनुमान चालीसा वाचायला जाणार होतो. पण सकाळीच आम्हाला पोलिसांच्या माध्यमातून ताब्यात घेण्यात आलं.’

ADVERTISEMENT

‘कुठेतरी काही शिवसैनिकांना पाठवून मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी आमच्या घरावर हल्ला करवला. आमच्यावर दगडफेक केली. असं वातावरण तयार केलं की, मुख्यमंत्र्यांनी आदेश या शिवसैनिकांना दिला की रवी राणा, नवनीत राणा यांच्यावर हल्ला करा. जर मुख्यमंत्री कायदा आणि सुव्यवस्था बिघडवणार असतील तर हे महाराष्ट्राचं दुर्भाग्य आहे.’

ADVERTISEMENT

‘उद्या देशाचे पंतप्रधान जे देशाचं गौरव आहे ते उद्या महाराष्ट्रात आणि मुंबईत येणार आहेत. एक आमदार म्हणून, खासदार म्हणून आमचं कर्तव्य आहे, महाराष्ट्राची संस्कृती आहे. जर आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा मुंबईत जर एखादा पाहुणा येत असेल तर त्यांच्या दौऱ्याला कुठेही गालबोट लागता कामा नये ही आपली संस्कृती आहे.’

‘मात्र, मुख्यमंत्र्यांना वाटतं की, अशाच प्रकारे कायदा आणि सुव्यवस्था बिघडू द्या. पंतप्रधानांचा दौरा रद्द झाला पाहिजे. पण मला माहिती आहे की, वेळात वेळ काढून देशाचे पंतप्रधान मुंबईत येत असतील तर ही अभिमानाची बाब आहे. या महाराष्ट्राला कुठली तरी दिशा, कुठला तरी संदेश आणि विकासाचा एक संकल्प घेऊन ते आपल्या महाराष्ट्रात येत आहेत.’

‘जी परिस्थिती मी पाहत आहे. त्यावर मुख्यमंत्री बोलायला तयार नाही. आज मुंबईच्या लोकांना त्रास दिल्यानंतर मातोश्रीबाहेर हनुमान चालीसा वाचत असाल हेच जर हनुमान जयंतीच्या दिवशी केलं असतं किंवा आज आम्हाला घेऊ दिलं असतं तर काय बिघडलं असतं उद्धव ठाकरेचं? हाच हनुमान भक्तांचा सवाल आहे.’

‘या ठिकाणी महाराष्ट्राची व्यवस्था बिघडविण्याचं काम जर ते करत असतील तर या महाराष्ट्राचा सुपुत्र म्हणून मुंबई आणि महाराष्ट्राचा एका घटक म्हणून माझी सुद्धा जबाबदारी आहे की, येथील कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये, नागरिकांना त्रास होऊ नये. तसेच पंतप्रधानांचा दौरा रद्द होऊ नये..’

‘मी आताच देवेंद्र फडणवीस यांचं म्हणणं ऐकलं की, त्यांची सुद्धा इच्छा आहे की, याठिकाणी दौरा कुठल्याही प्रकारे रद्द होऊ नये आणि आमची सुद्धा तशी इच्छा आहे. मला असं वाटतं की, देवेंद्र फडणवीस यांच्यासारखे मुख्यमंत्री हे राज्यात 5 होते. कधीही इथे दंगे झाले नाहीत.’

‘देवेंद्र फडणवीस यांनी मोठ्या गतीने महाराष्ट्राला पुढे आणलं. पण त्यापेक्षा 50 गतीने महाराष्ट्राला मागे आणण्याचं काम हे उद्धव ठाकरेंनी केलं आहे. म्हणून या ठिकाणी कुणालाही घाबरण्याचं काम नाही. कोणाच्याही धमकीलाही आम्ही घाबरत नाही. इथे कोणी आमच्यावर दबाव टाकत आहे आणि आम्ही माघार घेत आहे हेही कारण नाही.’

Shiv Sena: ‘येऊ दे राणा.. मैं झुकेंगा नही..’, 80 वर्षीय आजीबाईंनी ‘मातोश्री’समोर ठोकला तळ

‘या सगळ्या पार्श्वभूमीवर आम्ही ठरवलं आहे की, पूर्ण महाराष्ट्रात पोलिसांना सुद्धा त्रास होत आहे जनतेला त्रास होत आहे. त्यामुळे याठिकाणी जरी त्यांनी हनुमान चालीसाचा अवमान केला असेल मुख्यमंत्र्यांनी तरी आम्हाला देशाच्या पंतप्रधानांचा दौरा, लोकांचं संरक्षणं हे लक्षात घेऊन आम्ही आमचं आंदोलन याठिकाणी संपवत आहे.’

‘कालच आम्ही आमच्या हनुमान भक्तांना आवाहन केलं होतं की, जे मोठ्या प्रमाणात मुंबईत येणार होते त्यांनी आपल्या घरीच थांबावं असं आवाहन केलं होतं. कारण आम्हाला इथली सुरक्षा व्यवस्था बिघडू द्यायची नाही.’ असं म्हणत रवी राणा यांनी आपलं आंदोलन माघारी घेत असल्याचं जाहीर केलं.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT