निवडणूक आयुक्त नियुक्ती : सुप्रीम कोर्टाचा मोदी सरकारला मोठा धक्का
Supreme Court of india | election commissioners : मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court of india) केंद्रातील मोदी सरकारला (Modi Government) सर्वात मोठा धक्का दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीची प्रक्रिया बदलली आहे. पंतप्रधान, लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि भारताचे सरन्यायाधीश यांचा समावेश असलेल्या समितीच्या सल्ल्याने मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्तांची नियुक्ती राष्ट्रपतींकडून केली […]
ADVERTISEMENT

Supreme Court of india | election commissioners :
मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court of india) केंद्रातील मोदी सरकारला (Modi Government) सर्वात मोठा धक्का दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीची प्रक्रिया बदलली आहे. पंतप्रधान, लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि भारताचे सरन्यायाधीश यांचा समावेश असलेल्या समितीच्या सल्ल्याने मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्तांची नियुक्ती राष्ट्रपतींकडून केली जाईल, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने आज (गुरुवारी) दिले. (Supreme Court of India directs appointment of election commissioners on advise of committee of PM, LoP, CJI)
न्यायमूर्ती केएम जोसेफ यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाने सर्वानुमते हा निकाल देताना सांगितले की, संसदेद्वारे या विषयावर कायदा होईपर्यंत ही प्रक्रिया कायम राहील. सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की लोकसभेत विरोधी पक्षाचा नेता नसेल तर मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करण्यासाठी सर्वात मोठा विरोधी पक्षाचा नेता समितीवर असेल.
Kasba Peth Bypoll Results 2023 live: धंगेकर विजयाच्या उंबरठ्यावर! रासनेंना धक्का