…अन् ताम्हीणी घाटही शहारला! वाशिमच्या 6 तरुणांसोबत घाटात नेमकं काय घडलं?
कोकणात वर्षा पर्यटनासाठी निघालेल्या सहा तरुणांसोबत घडलेल्या घटनेनं प्रसंगाने ताम्हीणी घाटही शहारला असेल! वाशिम जिल्ह्यातील सहा तरुणांसोबत ताम्हीणी घाटात भयंकर दुर्घटना घडली. यात तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर तिघे गंभीर जखमी अवस्थेत आढळले. मृत आणि जखमींना शनिवारी (१९ ऑगस्ट) मध्यरात्री बाहेर काढण्यात आलं. ऋषभ किशोर चव्हाण (वय 24), कृष्णा पंडित राठोड (वय 27), सौरभ श्रीकांत […]
ADVERTISEMENT

कोकणात वर्षा पर्यटनासाठी निघालेल्या सहा तरुणांसोबत घडलेल्या घटनेनं प्रसंगाने ताम्हीणी घाटही शहारला असेल! वाशिम जिल्ह्यातील सहा तरुणांसोबत ताम्हीणी घाटात भयंकर दुर्घटना घडली. यात तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर तिघे गंभीर जखमी अवस्थेत आढळले. मृत आणि जखमींना शनिवारी (१९ ऑगस्ट) मध्यरात्री बाहेर काढण्यात आलं.
ऋषभ किशोर चव्हाण (वय 24), कृष्णा पंडित राठोड (वय 27), सौरभ श्रीकांत भिंगे (वय 25), रोहन परशुराम गाडे (वय 26), प्रवीण गजानन सरकटे (वय 26) रोहन किशोर चव्हाण (वय 22) (सर्व रा. मंगळूरपीर, जि. वाशिम) हे सर्व मित्र कोकणात फिरण्यासाठी निघाले होते. स्विफ्ट गाडीने (क्र MH 12 HZ 5535) देवकुंड येथे येत असतानाच काळाने त्यांच्यावर झडप घातली. यात तिघे जागेवर गतप्राण झाले.

वाशिमच्या तरुणांसोबत ताम्हीणी घाटात काय घडलं?
वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांनी ‘मुंबई Tak’शी बोलताना घडलेल्या दुर्घटनेबद्दल सविस्तर माहिती दिली. सहा तरुण कारमधून पुण्यावरून देवकुंडच्या दिशेने निघाले होते. शनिवारी दुपारी ४.३० वाजता कोंडेथर-सणसवाडी गावाच्या हद्दीतील दरीत त्यांचा अपघात झाला.










