कलाबेन डेलकर शिवसेनेच्या नाहीत म्हणणाऱ्यांचा जळफळाट! संजय राऊतांचं नारायण राणेंना उत्तर
कलाबेन डेलकर या शिवसेनेच्या नाहीत. त्यांनी धनुष्य-बाण चिन्हावर निवडणूक लढवली नाही. एक खासदार निवडून आल्यानंतर दिल्लीला धडक देण्याच्या गोष्टी संजय राऊत यांनी करू नयेत असं नारायण राणे यांनी म्हटलं होतं. त्याबाबत आता संजय राऊत खास शैलीत उत्तर दिलं आहे. काय म्हणाले आहेत संजय राऊत? नवनिर्वाचित खासदार कलाबेन डेलकर या शिवसेनेच्या नाहीत म्हणणाऱ्यांचा जळफळाट दिसतो आहे. […]
ADVERTISEMENT

कलाबेन डेलकर या शिवसेनेच्या नाहीत. त्यांनी धनुष्य-बाण चिन्हावर निवडणूक लढवली नाही. एक खासदार निवडून आल्यानंतर दिल्लीला धडक देण्याच्या गोष्टी संजय राऊत यांनी करू नयेत असं नारायण राणे यांनी म्हटलं होतं. त्याबाबत आता संजय राऊत खास शैलीत उत्तर दिलं आहे.
काय म्हणाले आहेत संजय राऊत?
नवनिर्वाचित खासदार कलाबेन डेलकर या शिवसेनेच्या नाहीत म्हणणाऱ्यांचा जळफळाट दिसतो आहे. जरा निवडणूक आयोगाची वेबसाईट बघा शिवसेना जिंदाबाद असं ट्विट करत संजय राऊत यांनी नारायण राणेंना उत्तर दिलं आहे. संजय राऊत यांनी ट्विट करून भारतीय निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर कलाबेन डेलकर यांच्या नावापुढे पक्षाचं नाव शिवसेना असं लिहिलेलं दिसतं आहे. सबसे अलग हूँ.. पर गलत नहीं. असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.