सायरस मिस्त्रींचा ऑन द स्पॉट मृत्यू का झाला? ऑटोप्सी रिपोर्टने उलगडलं गूढ

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

टाटा सन्सचे माजी चेअरमन सायरस मिस्त्री यांचा अपघाती मृत्यू हा खूपच भयंकर होता. मुंबई अहमदाबाद हायवेवर झालेल्या कार अपघातात सायरस मिस्त्री जागीच ठार झाले. ऑन द स्पॉट मृत्यू होण्याचं गूढ काय हा प्रश्न सगळ्यांनाच पडला होता. त्याचं गूढ आता उकललं आहे. कारण सायरस मिस्त्रींचा ऑटोप्सी रिपोर्ट समोर आला आहे.

सायरस मिस्त्री यांच्या मृत्यूनंतर काय प्रश्न निर्माण झाले आहेत?

मुंबई अहमदाबाद हायवेच्या रचनेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. तसंच कारच्या स्पीडबाबतही काही प्रश्न निर्माण झाले आहेत. कारचा स्पीड खूप जास्त होता असंही बोललं जातं आहे. दुसरीकडे सायरस मिस्त्री यांनी सीट बेल्ट लावला नव्हता अशाही चर्चा होत आहेत. अशात आता ऑटोप्सी रिपोर्टमुळे अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. तसंच सायरस मिस्त्रींचा मृत्यू ऑन द स्पॉट का झाला हेदेखील समोर आलं आहे.

सायरस मिस्त्रींचा ऑटोप्सी रिपोर्ट काय सांगतो?

जे. जे रूग्णालयाचे मेडिकल ऑफिसर यांनी ही माहिती दिली आहे की सायरस मिस्त्रींना अपघातादरम्यान गंभीर जखमा झाल्या. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर इंटरनल ब्लीडिंग झालं. या दोन मुख्य कारणांमुळे सायरस मिस्त्री यांचा ऑन द स्पॉट मृत्यू झाला अशी माहिती समोर आली आहे. सायरस मिस्त्री यांचा विस्तृत ऑटोप्सी रिपोर्ट समोर आलेला नाही. जो प्राथमिक अहवाल समोर आला आहे त्यात ही दोन कारणं नमूद करण्यात आली आहेत.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

कसा झाला सायरस मिस्त्रींचा अपघात?

सायरस मिस्त्री हे अहमदाबादहून मुंबईला चालले होते. मात्र याच हायवेवर डिव्हायडरला त्यांची कार धडकून अपघात झाला. या अपघातात सायरस मिस्त्री यांचा जागीच मृत्यू झाला. सायरस मिस्त्री हे ज्या मर्सिडिज कारमध्ये बसले होते तिथे त्यांच्यासह एकूण चारजण होते. मुंबईपासून १२० किमी अंतरावर असलेल्या पालघर जिल्ह्यातील चारोटी चेक नाका ओलांडल्यानंतर हा अपघात झाला. विशेष बाब म्हणजे ९ मिनिटात त्यांच्या कारने २० किमीचं अंतर पार केलं होतं.

तपासात हेदेखील समोर आलं आहे की अपघातात दोघांचा मृत्यू झाला आणि त्यांनी सीट बेल्ट लावला नव्हता. सायरस मिस्त्री आणि जहांगीर पंडोले हे मागच्या सीटवर बसले होते. या अपघातात दोघांचाही मृत्यू झाला.

ADVERTISEMENT

अनाहिता पंडोले कोण आहेत?

अनाहिता पंडोले या कार चालवत होत्या. अनाहिता या मुंबईतील प्रसिद्ध गायनॉकलॉजिस्ट आहेत. ब्रीच कॅण्डी रुग्णालयात त्या सेवा देतात. अनाहिता पांडोळे दीर्घकाळापासून ब्रीच कँडी हॉस्पिटलशी संबंधित आहेत. त्यांना ३० वर्षांपेक्षा जास्त अनुभव आहे आणि त्या मुंबईतील अनेक हाय-प्रोफाइल लोकांच्या कुटुंबातील महिलांचं बाळंतपण म्हणजे डिलिव्हरी त्यांनी केलेली आहे. त्यांनी सामाजिक प्रश्नावर नेहमी आवाज उठवला आहे. मुंबईत लागणाऱ्या होर्डिंगच्या विरोधात देखील त्यांनी मोहीम उघडली होती. गेल्या आठवड्यातच त्यांनी बीएमसीला पत्र लिहून वेस्टर्न एक्सप्रेस हाय्व्हेलगत असणाऱ्या फुटपाथवर लागणाऱ्या होर्डिंग्जचा विरोध केला होता. पारशी समाजातील लोकसंख्येतील घट रोखण्यासाठी राबविलेल्या जिओ पारसी या उपक्रमाच्या संस्थापकांपैकी त्या एक आहेत.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT