Rana vs Shiv Sena: मोठी बातमी… ‘मातोश्री’वर जाणार नाही!, नवनीत-रवी राणांनी ‘हट्ट’ सोडला
मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं खासगी निवासस्थान असलेल्या ‘मातोश्री’वर जाऊन आपण हनुमान चालीसा म्हणणार यावर ठाम असलेल्या राणा दाम्पत्याने आता मात्र माघार घेतली आहे. आपण ‘मातोश्री’वर जाणार नाही असं त्यांनी ANI वृत्तसंस्थेला सांगितलं. सुरुवातीला राणा दाम्पत्य हे दुपारी 3 वाजता पत्रकार परिषद घेणार असं कळविण्यात आलं होतं. मात्र, असं असताना त्याआधीच फक्त ANI वृत्तसंस्थेच्या पत्रकाराला […]
ADVERTISEMENT

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं खासगी निवासस्थान असलेल्या ‘मातोश्री’वर जाऊन आपण हनुमान चालीसा म्हणणार यावर ठाम असलेल्या राणा दाम्पत्याने आता मात्र माघार घेतली आहे. आपण ‘मातोश्री’वर जाणार नाही असं त्यांनी ANI वृत्तसंस्थेला सांगितलं.
सुरुवातीला राणा दाम्पत्य हे दुपारी 3 वाजता पत्रकार परिषद घेणार असं कळविण्यात आलं होतं. मात्र, असं असताना त्याआधीच फक्त ANI वृत्तसंस्थेच्या पत्रकाराला बोलावून राणा दाम्पत्याने आपलं आंदोलन आपण उद्या होणाऱ्या पंतप्रधानांच्या दौऱ्यासाठी मागे घेत आहोत. असं जाहीर केलं.
पाहा रवी राणा नेमकं काय म्हणाले:
‘हनुमान जयंतीच्या शुभपर्वावर मी हात जोडून विनंती केली होती की, राज्याच्या मुख्यमंत्र्यांना की त्यांनी मातोश्रीवर हनुमान चालीसाचं पठण करावं. आपण मुख्यमंत्री झाल्यापासून महाराष्ट्रावर मोठ्या प्रमाणात संकटं आली आहेत. तेव्हापासून महाराष्ट्राची जनता त्रस्त आहे. यासाठी त्यांनी पठण करावं हे मी सांगितलं होतं.’