‘..तर मी विकेट घेणारच ना’, पहाटेच्या शपथविधीवर शरद पवारांचे गौप्यस्फोट; फडणवीसांना टोले
Latest Political News Maharashtra: मला गुगली कशी टाकायची हे चांगलंच माहिती आहे. त्यामुळे समोरून विकेट दिली तर घेणारच ना.. असं म्हणत शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीसांवर जोरदार टीका केली आहे.
ADVERTISEMENT

Latest Political News Maharashtra: पुणे: पहाटेच्या शपथविधीवरुन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केले होते. ‘पवारांनी आमच्यासोबत डबलगेम केला.’ असं फडणवीस एका वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत म्हणाले होते. ज्यानंतर आज (29 जून) पुण्यात एक पत्रकार परिषद घेत शरद पवारांनी फडणवीसांना पुरतं खिंडीत गाठलं. ‘जर विकेट दिली तर आम्ही का घ्यायची नाही?, खरं तर त्यांना सत्तेशिवया करमत नव्हतं, अस्वस्थ होते.. गुगली कशी टाकायची हे मला माहिती आहे.’ असं टोला पवारांनी यावेळी हाणला. तसंच देवेंद्र फडणवीस हे सत्तेसाठी काहीही करु शकतात अशी टीकाही पवारांनी केली.
शरद पवारांची पत्रकार परिषदेत तुफान फटकेबाजी
‘मी निर्णय बदलला होता तर फडणवीसांनी शपथच का घेतली होती?’
‘देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आमची बैठक झाली… आणि दोन दिवसांनी त्यांनी आपली भूमिका बदलली.. समजा, बैठक झाली आणि भूमिका बदलली.. बैठक झाली काय.. मी जाहीरच बोललो होतो. मी जाहीर हे बोललो होतो की, तुम्हाला सरकार बनवायला लोकं कमी पडत असतील तर राष्ट्रवादी तुम्हाला बाहेरुन पाठिंबा देईल. पहिल्यांदा निवडणूक झाल्यानंतर त्यांना बाहेरून पाठिंबा देण्याची भूमिका मी घेतील, ज्यावेळी ते मुख्यमंत्री झाले. नंतर पाठिंबा द्यायची वेळ आली नाही.’
‘तो पाठिंबा देण्यामागे आमचं काही कारण होतं. त्यांच्याबद्दल फार कौतुक होतं असं नाही. पण दुसऱ्या काही गोष्टी होत्या.. त्यांच्यात मित्रांमध्ये कसं अंतर पडेल याची आम्हाला काळजी घ्यायची होती. तो त्या काळचा प्रश्न होता.’
हे ही वाचा>> ‘एकनाथ शिंदे माझे ‘बॉस’, पण…’, देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं 2024 मध्ये मुख्यमंत्री कोण ठरवणार?
‘यानंतरच्या काळाबाबत त्यांनी जे सांगितलं की, ते भेटले ही गोष्ट खरी आहे.. अनेक गोष्टींची चर्चा केली हे खरं आहे.. पण त्यांनी (फडणवीस) स्वत:च सांगितलं काल.. की, या संबंधीचं धोरण मी बदललं काल. 2 दिवस आधी. जर मी दोन दिवसांआधी धोरण बदललं होतं तर त्यानंतरच्या दोन दिवसांनी त्यांनी शपथ घ्यायचं काय कारण होतं?’ असा खडा सवाल शरद पवारांनी फडणवीसांना केला आहे.